याबद्दल

मजा आणि उत्कंठेने भरलेल्या मुलांसाठी आंतरराष्ट्रीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या दोन सीझन्सनंतर, अधिक बक्षिसे आणि आव्हाने घेऊन स्पर्धा पुन्हा आली आहे.

पहिल्या दोन सीझन्सना जगभरातल्या मुलांनी आपआपल्या निर्मिती पाठवण्यामार्फत उडंड प्रतिसाद दिला होता. तिसरा सीझन याहून जास्त उत्कंठावर्धक आणि करमणूकपर असल्याचे वचन देत आहे. या 3-या सीझनची थीम “केरळमधल्या गावातले जीवन” (केरल विलेज लाइफ) आहे. संदर्भासाठी आम्ही फोटो आणि व्हिडिओ दिले आहेत.

जगाच्या कोणत्याही भागातले 4 ते 16 वयोगटामधले कोणतेही मूल यात त्यांच्या एंट्रीज ऑनलाइन देऊ शकते. आईवडिल किंवा पालक आपल्या पाल्याच्या तर्फे नोंदणी करु शकतात आणि प्रत्येक सहभागी जास्तीत जास्त पाच एंट्रीज प्रस्तुत करु शकतात. भाग्यवान विजेते आणि प्रवर्तकांना केरळच्या महत्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पाच दिवसांच्या कौटुंबिक सहलीची स्पॉन्सरशिप मिळवू शकतात. एवढेच नाही तर सर्व श्रेणींमधल्या सर्वोत्तम एंट्रीजसाठी आकर्षक बक्षिसे आहेत. लगेच नोंदणी करा आणि देवाच्या स्वतःच्या देशातील सर्वोच्च स्थळांना भेट देण्याची संधी मिळवा!

Landscape Drawing