वारंवार विचारले जाणारे प्रश्न
कोण सहभागी होऊ शकेल?
4 आणि 16 वर्षे दरम्यान वय असलेले कोणतेही मूल (01.01.2007 रोजी/नंतर आणि 01.01.2019 रोजी/पूर्व जन्मलेले) जगातील कोणत्याही भागातून या स्पर्धेत सहभागी होऊ शकेल.
प्रौढ व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात का?
आपण 18 वर्षे आणि जास्त वयाचे असाल तर आपण स्वत:ला प्रवर्तक म्हणून रजिस्टर करु शकता. स्पर्धेत तुमच्या शिफारशीवर भागघेणारे कोणतेही मुल तुमच्या क्रेडिटमध्ये जोडले जाईल आणि जास्तीत जास्त एंट्रीज शक्य करणा-या प्रवर्तकना केरळला भेट देण्यासाठी कॉंप्लिमेंटरी टूर्स पॅकेजेस मिळतील.
एक प्रवर्तक कोण असतो?
वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली कोणीही व्यक्ती या स्पर्धेसाठी एक प्रवर्तक म्हणून नोंदणी करु शकेल. ही कृती ऐच्छिक आहे, आणि प्रवर्तकांना कोणत्याही स्वरुपाचे मानधन दिले जाणार नाही.
या स्पर्धेसाठी काही प्रवेश शुल्क आहे का?
नाही, या स्पर्धेतील प्रवेश मोफत आहे!
प्रवेशिका कोणत्या स्वरुपात सादर करायची आहे?
सहभागीने क्रेयॉन्स, रंगीत पेन्सिल्स किंवा रंग आणि ब्रश किंवा स्केच पेन्स वापरुन कागदावर हाताने एक चित्र काढणे अपेक्षित आहे. डिजिटल, इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिक साधनं वापरुन काढलेले चित्र या स्पर्धेसाठी स्विकारले जाणार नाही. नंतर ते चित्र कोणत्याही पद्धतीने डिजिटल स्वरुपात रुपांतरित करावे आणि केरळ पर्यटन स्पर्धा पेजवर अपलोड करावे (फाईलचा आकार 5MB हून अधिक नसावा). चित्राचा परिमाण किमान A4 आकाराचे असावे.
प्रवेशिकांच्या संख्येवर काही निर्बंध आहेत का?
इच्छुक केवळ एकदाच नोंदणी करु शकतो परंतु तो/ती इच्छुक असल्यास कमाल पाच प्रवेशिका पाठवू शकतो.
काय रेखाटावे लागेल, या स्पर्धेसाठी काही थीम आहे का?
स्पर्धेची थीम केरळच्या गावामधले जीवन ही थीम आहे! चित्रामध्ये केरळच्या गावाच्या संदर्भातले काहीही असू शकते. तुमच्या संदर्भासाठी आम्ही वेबपेज, व्हिडिओ आणि ई-ब्रोशर्स तयार केली आहेत, ज्यात सुंदर चित्रे व व्हिडिओज आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी इथे मिळतील.