अद्भुत बक्षिसे आपल्या प्रतीक्षेत आहेत!

तुमच्या लहानग्याने जिंकलेल्या सुटीच्या सहलीवर जाण्याचा विचार कसा वाटतो?

मस्तच आहे! नाही का?
तुमच्या पाल्याला चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला लावण्यामार्फत तुमच्या सर्वकाळ आवडत्या स्थळाची - “देवाचा स्वतःचा देश केरळ”ची पाच दिवसांची सहल जिंकण्याची संधी पटकावता येऊ शकते.
मुलांसाठी आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा 2023 विजेत्यांना सुंदर बक्षिसे ऑफर करत आहे.

 

बक्षिसे पाच श्रेणींमध्ये विभागलेली आहेतः

जगाच्या कोणत्याही भागातून केरळची एक सहल!

3 विजेते

सर्व श्रेणीतल्या सर्वोत्तम तीन विजेत्यांना पाच दिवसांची स्पॉन्सर्ड सहल मिळेल, ज्यायोगे पदक आणि प्रमाणपत्राव्यतिरिक्त त्यांना केरळच्या स्थळांना देखील भेट देता येईल.

10 विजेते

भारताबाहेरच्या, जगभरातील10 विजेत्यांना, केरळची पाच दिवसांची कौटुंबिक सहल जिंकण्याची संधी मिळत आहे. सहलीसाठी विजेत्यासोबत दोन सदस्य जाऊ शकतील. निसर्गसौंदर्याने भरलेल्या देखण्या भागाच्या मजेशीर कौटुंबिक सहलीसाठी तयार व्हा.

भारतामधून कोणत्याही भागातून केरळची सहल!

5 विजेते

भारतातील 5 विजेत्यांना केरळच्या पाच दिवसीय कौटुंबिक सहलीला जिंकण्याची संधी मिळणार आहे. सहलीसाठी विजेत्यासोबत दोन सदस्य जाऊ शकतील. या देशातील एका अतिशय सुंदर राज्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत काही दिवस घालवण्याहून आणखी उत्कंठावर्धक दुसरं काय असू शकेल!

निसर्गाच्या सानिध्यात रहा

3 विजेते

केरळच्या सर्वोत्तम तीन विजेत्यांना मोमेंटो आणि प्रमाणपत्राच्या व्यतिरिक्त केरळमधल्या प्रीमियम प्रॉपर्टीमध्ये 2 रात्री राहण्यासाठी बुकिंग कुपन मिळणार आहे.

सुंदर भेटवस्तू

70 विजेते

भारताबाहेरच्या 20 विजेत्यांना, भारतातल्या 30 आणि केरळमधल्या 20 विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.

भारताबाहेरील प्रवर्तक

5 विजेते

सर्वाधिक सहभागी स्पर्धेसाठी आणणाऱ्या भारताबाहेरील पाच प्रवर्तकांना केरळमधील ठिकाणांना भेट देण्यासाठी पाच-दिवसांचे पॅकेज मिळेल.

भारतातील प्रवर्तक (केरळच्या बाहेरील)

5 विजेते

सर्वांधिक संख्येनं या स्पर्धेसाठी सहभागी आणणाऱ्या भारतातील परंतु केरळबाहेरुन पाच प्रवर्तकांना केरळमधील ठिकाणांना भेट देण्यासाठी पाच दिवसांचे पॅकेज मिळेल.

इतर सर्व सहभाग्यांना सहभाग घेण्याबद्दल ऑनलाइन डिजिटल प्रमाणपत्र दिली जातील, ज्यांना सहभागी निकाल जाहिर झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत डाउनलोड करु शकतात.
रोख रक्कमेला कोणताही पर्याय नाही आणि बक्षिसे दिल्यानुसारच घेतली पाहिजेत.

एकंदर 101 विजेते!

18 विजेत्यांना केरळची कौटुंबिक सहल जिंकण्याची संधी!

10 विजेत्यांसाठी सोलो ट्रीप्स!

 

Landscape Drawing