आयुर्वेद – शरीर, मन आणि आत्म्याची एकतानता
भारतात साधारण ख्रिस्तपूर्व 600 च्या सुमारास आयुर्वेदाचा उदय झाला. या नवीन व्यवस्थेने व्याधींवर उपचार करण्याबरोबरच व्याधींना टाळता कसे येईल यावरही जोर दिला. आर्य आणि द्रविडांनीही ज्याचे अनुसरण केले तो आयुर्वेद आजपर्यंत आचरणात आहे. आज ती वैद्यकशास्त्राची एक वेगळी, महत्त्वाची शाखा आहे – ही एक संपूर्ण निदानात्मक व्यवस्था आहे जी तुमच्या शरीराच्या प्रकृति-निदानावर आधारित आहे म्हणजेच, वात, पित्त आणि कफ यांच्या संतुलनावर आधारित आहे.
आयुर्वेद केवळ व्याधिग्रस्त अवयवापुरते उपचार करत नसून व्यक्तीच्या संपूर्ण शरीराचा विचार करते आणि शरीरातील सर्व विषारांचे असंतुलन दूर करून प्रतिकारक्षमता आणि आरोग्य परत आणते.
केरळ, आयुर्वेदाची भूमी
केरळमधील सम हवामान, नैसर्गिक वनांची दाटी (जी वनौषधी आणि औषधी वनस्पतींच्या समृद्धीने परिपूर्ण आहे), आणि थंड पावसाळा (जून ते जुलै आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर) हा आयुर्वेदाच्या रोगनिवारक आणि पुनर्जीवन देणाऱ्या उपचार पॅकेजेससाठी सर्वोत्तम आहे.
खरे म्हणजे, आज केरळ हे भारतातील एकमेव राज्य आहे जे या वैद्यकशास्त्रीय शाखेचा प्रचार प्रसार निष्ठेने करते.
पावसाळा, नवसंजीवनासाठी सर्वोत्तम काळ
प्राचीन ग्रंथांनुसार पावसाळा हा नवसंजीवन उपचारांसाठी सर्वोत्तम काळ आहे. हवा धूळ-विरहित आणि थंड असते ज्यामुळे शरीराची रंध्रे सर्वाधिक प्रमाणात उघडी होतात आणि वनौषधी तेले आणि उपचार आतपर्यंत पोहचू शकतात.
आयुर्वेद व्हिडिओ
केरळ पर्यटनाद्वारे वर्गीकृत केलेली आयुर्वेद आरोग्य केंद्रे
कायाकल्प उपचार (रसायन चिकित्सा)
उपचार कार्यक्रम
आयुर्वेद हॉस्पिटल
योग केंद्रे