'जगण्यापासून दूर जायचं म्हणून हा प्रवास नाही, तर जगणं निसटून जाऊ नये यासाठी हा प्रवास आहे' कधी कधी आपण जगण्यासाठीच्या उपजीविकेतच इतके हरवून जातो, की प्रत्यक्ष जगणं विसरून जातो घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर, अशा च्क्रात गुरफटल्याने आपलं जगणं एकसुरी होतंय अशा च्कात अडकल्यानं, आपल्या कुटुंबियांसोबतचे मौलिक क्षणही अनेकदा हरवून जातात. जरा आठवा वरं, आपल्या जिगरी दोस्तांनो आपण शेवटचे कधी बरं भेटलो होतो?
आता वेळ आली आहे, हे सारं पुन्हा मिळवण्याची.. चला तर मग, बॅगा उचला आणि या केरळमध्ये.. नव्या आठवणींचं विश्व तयार करायला, ताजंतवानं होण्यासाठी केरळनं असंख्य पर्यायांचा खजिना खुला केलाय … पाचूच्या रंगाची बॅकवाटर्स, हिरवीगार थंड हवेची ठिकाणं, वन्यप्राण्यांचं विलक्षण जग, फेसाळत कोसळणारे धबधबे,बहरलेली वनराजी, विस्तारलेली भातशेती, जादूभरे महोत्सव आणि मोहक कलाप्रकारांचं समृद्ध विश्व.. हे सारं अनुभवा केरळमध्ये … हे सारं तुमच्या जगण्यातली नीरसता दू करतं एवढंच नव्हे तर चकमकत्या कृत्रिम वॉलपेपरच्या पलीकडचा अस्सल निसर्गनुभव देतं… तेव्हा चला, सामान बांधा आणि जगातल्या सर्वांत सुंदर ठिकाणांपैकी एक असणाऱ्या केरळला भेट द्या…
जेव्हा जुन्या आठवणी तुम्हाला सांगतील, की काय विस्मरणात गेलंय, ते सारं आठवण्यासाठी देवभूमी केरळमध्ये या..इथल्या डोंगरदऱ्या, बॅकवॉटर्स, समुद्रकिनारे आणि निसर्गसंपन्न जंगलांमध्ये तो जुना काळ पुन्हा जगा…
त्याच त्या चक्रात अडकल्यानं जेव्हा जगण्यातलं चैतन्य गमावल्यासारखं वाटतं, आणि पाहिलेली स्वप्नं दूरस्थ वाटू लागतात, तेव्हा ते हरवलेले क्षण फिरुन जगण्यासाठी, चैतन्याचं जागरण करण्यासाठी केरळमध्ये या..या देवभूमीतील दऱ्याखोऱ्यांत, बकवाटर्समध्ये, सागरकिनाऱ्यांवर आणि वनसमृद्ध जंगलांमध्ये सैर करताना, ते निसटलेले क्षण पुन्हा मिळवा…
तुम्हाला जेव्हा उमगतं, ती जगण्यातले अनमोल क्षण नकळत निसटून गेले आहेत..तुम्ही आपल्या कुटुंबियांसह केरळला या..निसटलेलं, हरवलेलं सारं पुन्हा मिळवण्यासाठी देवभूमी केरळसारखी निळ्याशार समुद्रकिनाऱ्यांची, बॅकवॉटर्सची, हिरव्यागार जंगलांची सुवर्णभूमी तुमची वाट पाहते आहे…