उत्सव हे या देवाच्या देशातील खरे उत्सव असतात, यांमुळं केरळच्या साध्या जीवनशैलीत भव्यता येते. मग तो राज्याचा ओणम चा उत्सव असो किंवा स्थानिक तीर्थक्षेत्रातील उत्सव, नवीन कपडे आणि शानदार मेजवान्या नक्कीच असतात.
केरळमधील उत्सव हे केवळ आनंदस साजरा करण्याचे दिवस नसून, या भूमीच्या कला आणि संस्कृतीला जतन करणारे आहेत. उत्सव सामाजिक असो वा धार्मिक, पारंपरिक असो वा आधुनिक, कलाप्रदर्शनाशिवाय तो कधीच पूर्ण होत नाही आणि ही कलासुद्धा 2000 वर्षे प्राचीन कुटियाट्टम पासून आधुनिक स्टेज शो पर्यंत.
|