केरळमध्ये करा हाऊस बोटमधून सफर!
तुम्ही केरळच्या बॅकवॉटरवर हाऊस बोटमधून विहार केला आहे का? केला नसेल तर नक्की करा. हा नक्कीच एक आश्चर्यकारक आणि अविस्मरणीय अनुभव असेल!
आज हाऊस बोट म्हणजे एक प्रचंड मोठ्या, हळू फिरणाऱ्या, आलिशान बोटी आहेत ज्या आरामदायी प्रवासापुरत्या वापरल्या जातात आणि जुन्या केट्टुवल्लमचे हे नवे रूप आहे. मूळचे केट्टुवल्लम हे अनेक टन भात आणि मसाले वाहून नेण्यासाठी वापरले जायचे. सामान्य केट्टुवल्लम मध्ये साधारण 30 टन सामान कुट्टनाडपासून कोचीपर्यंत वाहून नेता येते.
केट्टुवल्लम काथ्याच्या दोऱ्यांनी एकत्र बांधलेली असते. बोट बांधणीत एकही खिळा वापरलेला नसतो. जॅकवुडच्या फळ्यांनी आणि काथ्याने ही बोट बनवलेली असते. यावर नंतर उकळलेल्या काजुगरांपासून बनवलेली काळ्या रंगाची राळ लावली जाते. काळजी घेतली असता केट्टुवल्लम पिढ्यानपिढ्या चालते.
केट्टुवल्लम चा एक भाग बांबू आणि काथ्याने झाकलेला असतो ज्याला कर्मचाऱ्यांचे रेस्टरूम आणि स्वयंपाकघरासारखे वापरले जाते. स्वयंपाक बोटीवरच केला जातो आणि बॅकवॉटरमधून पकडलेल्या ताज्या मासळीची जोड त्याला असते.
परिवहनात ट्रकनी यांची जागा घेतल्यावर, या बोटींचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी, हा नवीन मार्ग काढण्यात आला ज्यात 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या बोटींचा समावेश आहे. पर्यटकांसाठी विशेष निवासी खोल्या बांधल्याने या बोटी ज्या नष्टप्राय होण्याच्या मार्गावर होत्या त्यांनी ही आजची प्रसिद्धी मिळवली आहे.
आता या बॅकवॉटरवर सगळीकडे दिसून येतात आणि एकट्या अलप्पुझामध्ये जवळ जवळ 500 हाऊस बोट आहेत.
केट्टुवल्लम पासून हाऊस बोट बनवताना, केवळ नैसर्गिक पदार्थ वापरण्याची काळजी घेतली गेली. बांबू मॅट्स, काठ्या, लाकूड, सुपारीची झाडे यांचा उपयोग छतासाठी, जमिनीसाठी काथ्यांच्या चटया, लाकडी फळ्या आणि नारळाच्या झाडाचे लाकूड आणि काथे पलंगासाठी वापरले जातात. उजेडासाठी सोलर पॅनेलचा वापर केला जातो.
आज, हाऊस बोटमध्ये उत्तम हॉटेलसारख्या सर्व सुखसोयी असतात ज्यात फर्निश्ड बेडरूम, आधुनिक टॉयलेट, आरामदायक दिवाणखाने, स्वयंपाकघर आणि पाहण्यासाठी बाल्कनीसुद्धा. लाकडी किंवा पामची कोरलेली छते सावली देऊन अखंड दृश्य दाखवतात. बहुतेक बोटी स्थानिक नाविक चालवतात तर काही 40 एचपी इंजिनने चालतात. बोट-ट्रेन ज्यात दोन किंवा अधिक बोटी एकत्र बांधल्या जातात त्यांचाही उपयोग अनेक पर्यटक करतात.
हाऊस बोटमधली सर्वात जादुई गोष्ट म्हणजे तरंगतानाच अशा ग्रामीण केरळचे दर्शन जो अन्यथा पोहोचण्यासारखा नाही. मग आहे ना सुंदर?
केरळ टूरिझमच्या क्लासिफाईड हाऊस बोट चालकांच्या यादीतून चालक निवडण्यासाठी
येथे क्लिक करा: