Trade Media
     

कूत्तु, केरळची अभिनय कला


कुत्तु हे केरळच्या मंदिरांमधील कूथमबलममध्ये स्वतंत्रपणे किंवा कुट्टियट्टमच्या एक भाग म्हणून सादर होते. चक्कियार विदूषक किंवा चतुर उपनायकाची भूमिका करतो. महाकाव्यांमधील (रामायण आणि महाभारत) या अप्रतिम आख्यानांद्वारे, चक्कियार आजच्या परिस्थितीवरही भाष्य करतो. त्याच्या खिल्ली उडविण्यातून कोणीही सुटत नाही. त्याच्या या विनोदात निष्पाप मस्करीपासून अप्रत्यक्ष शालजोडीतले टोमणे हाणणे आणि द्विअर्थी बोलण्यापर्यंत सारे काही असते. कुत्तूला मधेच मिझवू या तालवाद्याचीही साथ असते.    

नंगयार कुत्तू हा कुत्तूचाच एक प्रकार असून चक्कियार जातीच्या स्त्रिया नंगयार यांच्याद्वारे केले जाते.   हेही एक एकल सादरीकरणाचे नृत्य नाट्य असून मुख्यतः श्रीकृष्णांच्या कथांवर आधारलेले असते. श्लोक म्हटले जातात आणि त्यावर मुकाभिनय आणि नृत्य केले जाते. मुद्रा कुट्टियट्टमप्रमाणेच असून अधिक तपशीलवार असतात. वडक्कुमनाथ, अम्बलप्पुझाचे श्री कृष्ण मंदीर, इरिंजलक्कुडाचे कूडल माणिक्यम मंदीर आणि कोट्टयमचे कुमारनअल्लूर मंदीर येथे हा कलाप्रकार आजही सादर केला जातो. 


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia