 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
तेक्कडि, इडुक्की |
|
 |
उंची: समुद्रस पाटीपासून 900-1800 मीटर उंचावर.
पाऊस: 2500 मिमी.
तेक्कडि हे नाव उच्चारताच हत्ती,जणु साखळीप्रमाणे अखंड असणार्यां पर्वतरांगा आणि सुगंधी मसाल्यांनी युक्त असे मळे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. तेक्कडिचे पेरियार वन हे भारतातील एक उत्तम असे वन्य जीव अभयारण्य मानले जाते. येथे सर्वत्र मनोरम बगिचे/मळे आणि पर्वतरांगांनी वेढलेली शहरे वसलेली आहेत, जी ट्रेकिंगसाठी तसेच पर्वतारोहणाची सुयोग्य संधी प्रदान करतात.
रस्त्याद्वारे-
कुमलीपासून(4 किमीदूर) वेगवेगळ्या पर्यटन स्थळांपर्यंत नियमित बस सेवा उपलब्ध आहेत..
तेक्कडिपासून काही प्रमुख पर्यटन स्थळांचे अंतर
- कुमली: 4किमी (15 मिनिटे) साबरीमला मार्गे.
- पुल्लुमेडू: 50 किमी (2 तास)
- इडुक्की: 65 किमी (2 1/2 तास)
- मुन्नार: 106 किमी (4तास)
- कुमरकम: 128 किमी (4 तास) साबरीमला मार्गे.
- एरूमेली: 134 किमी (4 तास)
- कोडाईकॅनाल: 149 किमी (5तास)
- अलप्पुझा: 164किमी (5 तास)
- कोल्लम: 220किमी (6 तास)
- ऊटी: 390 किमी (11तास)
कुमली येथून सुटणार्या बसच्या वेळा:
- तेक्कडि: 09.30, 10.45, 11.30, 12.00, 12.30, 13.30, 15.30 वाजता
- कुमकरम: 07.00 वाजता
- मुन्नार: 06.00, 09.45, 13.30वाजता
- एर्नाकुलम् : 07.00, 13.30, 15.15, 16.30,17.15, 19.30 वाजता
- थिरुवनंतपुरम (कुमली द्वारा): 08.40, 15.30, 16.15 वाजता; (तेक्कडि द्वारा): 08.20, 15.15 वाजता
- कोट्टयम:नियमित बस सेवा
- अलप्पुझा :11.15 वाजता
- चेरतला: 14.15वाजता
- इडुक्की : नियमित बस सेवा
- चेन्नई: 16.30, 19.00 वाजता
- पॉन्डिचेरी: 16.30 वाजता
- मदुराई: 01.15, 05.15, 05.25, 06.45, 07.16, 07.20, 07.30, 07.55, 08.35, 09.40, 10.30, 10.45, 11.20, 11.55, 13.00, 13.15, 13.20, 14.20, 15.15, 15.40, 15.50, 16.50, 17.05, 18.00, 18.40, 19.05, 20.45 वाजता
- डिन्डीगल: नियमित बस सेवा
- कोडाईकॅनाल: कुमलीपासून कोडाईकॅनालला जाण्यासाठी थेट बस सेवा उपलब्ध नाही. डिन्डीगलची बस आपल्याला वथालकुंडू येथे घेऊन जाईल आणि तेथून पुढे कोडाईकॅनालला (149 किमी)जाण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने बस सेवा उपलब्ध आहेत.
- त्रिची: 08.55, 10.45, 19.25 वाजता Palani: 09.30, 11.35, 18.30, 18.50 वाजता
वनस्पती
साधारण 1965 हून अधिक फुले येणारी झाडे, 171 प्रकारची गवताची झाडे आणि 143 प्रकारची ऑर्किड्स आणि केवळ येथेच सापडणारा दक्षिण भारतीय पोडोकार्पस वैलिचियानस.
जीवजंतू
सस्तन जनावरे: जंगली हत्ती,गौर,सांबर,हरिणे,तसेच जंगली डुक्कर यांच्यासारख्या एकूण पस्तीस प्रजाती तुम्ही येथे नौकाविहार करताना पाहू शकता. ऊंच शिखरे असणार्या क्षेत्रांमध्ये आपण नीलगिरी टार, सदाहरित जंगलांमधून लुप्तप्राय होत चाललेला प्राणी – लायन टेल्ड मकाक, मलबारी मोठी खार,उडणारी खार, वाघ, जंगली मांजर, स्लॉथ नावाच्या अस्वलाची जात यांसारख्या वन्य जीवांचे दर्शन घेऊ शकता.
पक्षी: येथे एकूण 265 जातींचे पक्षी आढळत असून यात प्रवाशी पक्षी देखील अंतर्भूत आहेत. येथे धनेश (हॉर्न बिल), सारस/क्रौंच पक्षी, सुतारपक्षी, खंड्या, गरूड, कॉर्मेरेंट, मैना, तीर पक्षी इत्यादी पक्षी देखील आहेत.
सरपटणारे प्राणी: कोब्रा जातीचे नाग, काळे साप, क्रेट नावाचे विषारी साप, अनेक िबिनविषारी साप आणि मॉनिटर जातीची पाल येथे आढळते.
उभयचर प्राणी: बेडूक, विषयुक्त बेडूक, पाय नसलेला कॅसेलियन, ज्यामध्ये मलाबार ग्लाइडिंग बेडूक, सामान्य भारतीय टोड(विषारी बेडूक), कवकीय बेडूक आणि दोन रंगांचा बेडूक यांचा समावेश होतो.
जलचर(मासे): पेरियार तलाव आणि जलधारांमध्ये माशांच्या अनेक जाती पहावयास मिळतात, ज्यामध्ये मशीर नावाच्या भारतातील प्रसिद्ध आणि भयानक अशा क्रीडा माशाचाही समावेश होतो. येथील नौकाविहाराद्वारे आपण ओटर मासा, जो तलावात सापडणारा एकमेव स्तनपायी आहे, त्याची देखील झलक पाहू शकता.
बगिचे/मळे: पेरियार वन्यजीव अभयारण्याच्या चारही बाजूला चहा. वेलची, काळी-मिरी आणि कॉफ़ीचे मळे आढळतात.
अभयारण्य पहारा स्तंभ(वॉच टॉवर) : पेरियार वनाच्या आत दोन वॉच टॉवर आहेत. याचे आरक्षण वन सूचना केंद्र, तेक्कडि द्वारे केले जाते., दूरध्वनी: 322028.
अनुमती अधिकारी : वन्यजीव रक्षण अधिकारी, पेरियार टायगर रिझर्व, तेक्कडि.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|