 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
फोर्ट कोच्ची |
|
 |

फोर्ट कोच्चीचे ऐतिहासिक शहर व्यवस्थित पहायचे असेल, तर चालत फिरणे याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. चिंतामुक्त व्हा, मोठा श्वास घ्या आणि सुती कपडे, मऊ जोडे आणि हो स्ट्रॉ हॅट घालून बाहेर पडा. इतिहासात बुडलेल्या ह्या द्वीपाच्या प्रत्येक भागात तुम्हाला काही ना काही आकर्षक नक्कीच सापडेल. हे त्याचे स्वत:चे विश्व आहे, गतकालीन युगाचे नमुने जपणारं आणि त्या दिवसांचा त्याला आजही अभिमान वाटतो. जर तुम्ही भूतकाळाचा गंध ओळखू शकत असाल, तर ह्या रस्त्यांवरून चालायला तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.
के.जे मार्शल मार्गावरून सरळ चालत गेलं आणि डावीकडे वळलं की तुम्हाला फोर्ट एमेनुएलची झलक मिळेल. हा किल्ला कोणे एके काळी पोर्तुगीजांच्या मालकीचा होता आणि तो कोचिनचे महाराज आणि पोर्तुगालचे सम्राट, ज्यांच्या नावावरून किल्ल्याचे नाव पडले आहे, ह्यांच्यात झालेल्या तहाचे प्रतीक आहे. हा किल्ला 1503 मध्ये बांधण्यात आला आणि 1538 मध्ये त्याचे बळकटीकरण करण्यात आले. अजून थोडे पुढे गेल्यावर, तुम्ही डच कबरस्तानात पोहचता. 1724 मध्ये प्रतिष्ठापित केलेल्या आणि दक्षिण भारतातल्या चर्चद्वारे सांभाळले जाणार्याा ह्या कबरस्तानातील कबरींचे दगड शांतपणे पर्यटकांना त्या युरोपीय लोकांची आठवण करून देतात ज्यांनी त्यांच्या वसाहतींच्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी आपली मातृभूमी सोडली..
पुढील प्रेक्षणीय स्थळ आहे प्राचीन ठाकूर हाऊस, जे वसाहतीच्या युगाचा कॉंक्रीट नमुना म्हणून ताठ उभे आहे. इमारत अक्षरश: सुंदर आहे. आधी कुनल किंवा हिल बंगला ह्या नावाने ओळखली जाणारी ही इमारत, ब्रिटिशांचे राज्य असताना नॅशनल बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकांचे घर असायची. आता, ती चहाची प्रसिद्ध व्यापारी कंपनी, ठाकूर आणि कंपनीच्या मालकीची आहे.
पुढे चालत रहा आणि तुम्हाला आणखी एक वसाहतीची रचना पहायला मिळेल - डेव्हिड हॉल. हा 1695 च्या आसपास डच ईस्ट इंडिया कंपनीने बांधला होता. हा हॉल प्रसिद्ध डच कमांडर हेनरिक एड्रियन वान रीड ड्रैकेस्टनशी संबंधित आहे, जे केरळच्या नैसर्गिक वनस्पतींवर त्यांनी लिहिलेल्या होर्टस मलाबैरिकस ह्या पुस्तकासाठी अधिक ओळखले जातात. मात्र, डेव्हिड हॉल हे नाव हॉलचे नंतरचे मालक, डेव्हिड कोडर ह्यांच्या नावावरून पडले.
चार एकरचे परेड ग्राउंड (मैदान), जेथे कधीकाळी पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिशांनी लष्करी कवायती सादर केल्या होत्या, ते पार केल्यानंतर तुम्ही सेंट फ्रान्सिस चर्चजवळ पोहचता, भारतातले सर्वात जुने युरोपीअन चर्च. पोर्तुगीजांनी 1503 मध्ये बांधल्यापासून ते अनेक परिस्थितींमधून गेले आहे. आता हे चर्च दक्षिण भारताची चर्चच्या अखत्यारित आहे. हे तेच चर्च आहे जेथे वास्को द गामाला पुरण्यात आले होते आणि त्याच्या थडग्यावरचा दगड आजसुद्धा पाहता येऊ शकतो.
चर्चचा रस्ता चालण्यासाठी खूप छान आहे, जेथे अरबी समुद्रावरून येणारी थंड हवा तुमच्या शरीराला हळूवार स्पर्शून जाते. समुद्राच्या जरा जवळ चालत जा आणि तेथे कोचीन क्लब आहे, इथे एक सम्रुद्ध वाचनालय आणि खेळांच्या ट्रॉफींचा संग्रह आहे. सुंदर दृश्ये असलेल्या पार्कमध्ये वसलेला हा क्लब आजही त्याचे ब्रिटिशकालीन वातावरण राखून आहे..
चर्च मार्गावर परत येताच, डाव्या हाताला, तुम्हाला आणखी एक दिमाखदार वाडा पहायला मिळेल, बॅस्टियन बंगला. इंडो-युरोपीअन पद्धतीची ही सुंदर रचना 1667 मध्ये करण्याता आली होती आणि ह्याचे नाव जुन्या डच किल्ल्याच्या स्ट्रॉमबर्ग बॅस्टियन स्थानाच्या नावावरून पडले आहे जेथे आज हा बंगला आहे. आता हे उप जिल्हाधिकार्यााचे अधिकृत निवासस्थान आहे.
वास्को द गामा सक्वेअर जवळच आहे. एक अरुंद पायवाट (विहारपथ), थोडावेळ विश्रांतीसाठी ही आदर्श जागा आहे. येथे मिळणारे स्वादिष्ट सागरी खाद्य पदार्थ आणि नारळाचे पाणी खरोखरीच मोहात टाकणारे आहे. थोडावेळ ह्या सगळ्यांची मजा घ्या आणि वर-खाली होणार्याक चिनी मासेमारी नेट्सवर नजर टाका. ह्या जाळ्या कुबलाय खानच्या दरबारातील व्यापार्यां नी इसवी सन 1350 आणि 1450 दरम्यान इथे लावल्या.
ताजेतवाने होऊन आता पीयर्स लेस्ली बंगल्याकडे चला, एक प्रसन्न वाडा, जो कधीकाळी कॉफीचे व्यापारी, पीयर्स लेस्ली आणि कंपनीचे कार्यालय होता. ही इमारत पोर्तुगीज, डच आणि स्थानिक प्रभाव प्रतिबिंबित करते. पाण्यासमोर येणारी ह्याची पडवी आणखी एक आकर्षण आहे. उजवीकडे वळल्यावर, तुम्ही जुन्या हार्बर हाऊसजवळ येता, 1808 मध्ये बांधण्यात आले होते आणि प्रसिद्ध चहा व्यापारी कॅरिएट मोरन आणि कंपनीच्या मालकीचे होते. जवळच कोडर हाऊस आहे, अतिशय सुंदर इमारत, जी कोचीन इलेक्ट्रिक कंपनीच्या सॅम्युअल. एस कोडरने 1808 मध्ये बांधली होती. ही रचना वास्तुकलेचे वसाहतींमधून इंडो-युरोपीअनमध्ये झालेले संक्रमण दर्शविते..
पुन्हा उजवीकडे वळा आणि तुम्ही प्रिंसेस स्ट्रीटवर पोहोचाल. इथल्या दुकानांमधून तुम्ही ताजी फुले खरेदी करु शकता. या भागातल्या सगळ्यात आधीच्या रस्त्यांपैकी एक असणार्याफ ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला युरोपीअन पद्धतीची घरे आहेत. इथेच लोफर्स कॉर्नर आहे, कोच्चीच्या मजामस्ती आणि क्रीडाप्रेमी लोकांसाठीचे एक पारंपरिक स्थळ.
लोफर्स कॉर्नरपासून उत्तरेला गेल्यावर, तुम्ही सांता क्रूझ बॅसिलिकाला येऊन पोहचाल, पोर्तुगीजांनी बांधलेले ऐतिहासिक चर्च आणि 1558 मध्ये पोप पॉल IV ने ह्याचा दर्जा वाढवून त्याला कॅथेड्रल घोषित केले. 1984 मध्ये, पोप जॉन पॉल II ने त्याला बॅसिलिकाचा दर्जा बहाल केला. बर्गर स्ट्रीट आणि डेल्टा स्ट्रीटवर नजर टाकल्यावर तुम्ही परत प्रिंसेस स्ट्रीट आणि त्यानंतर रोज स्ट्रीटवर पोहचाल. डेल्टा स्टडी देशाच्या संस्कृतीचा वारसा असलेली एक वास्तु आहे जी 1808 मध्ये बांधण्यात आली. आता ही एका हाय स्कूलच्या रुपात कार्यरत आहे. रोज स्ट्रीटवर वास्को हाऊस आहे, हे वास्को द गामाचे निवासस्थान होते असे मानले जाते. हे पारंपरिक आणि विशिष्ट युरोपीअन घर कोच्चीमधल्या सर्वात जुन्या पोर्तुगीजांच्या घरांपैकी एक आहे.
डावीकडे गेल्यावर, तुम्ही रिड्सडेल मार्गावर याल जेथे तुम्हाला मोठे लाकडाचे VOC गेट (प्रवेशद्वार) पहायला मिळते, जे परेड ग्राउंडच्या (मैदानाच्या) समोर आहे. हे गेट 1740 मध्ये बांधले गेले होते आणि त्याचे नाव ह्यावर अंकित डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मोनोग्राम (VOC) मुळे पडले. ह्याच्या जवळच युनायटेड क्लब आहे, जो कधीकाळी कोच्चीच्या इंग्रजांच्या चार एलिट क्लबांपैकी एक होता. आता इथे जवळच असलेल्या सेंट फ्रांसिस प्रायमरी (प्राथमिक) शाळेचे वर्ग भरतात.
सरळ गेल्यावर, तुम्ही रस्त्याच्या शेवटाला पोहचता आणि तेथे बिशप हाऊस आहे, जे 1506 मध्ये बांधण्यात आले होते. कधीकाळी ते पोर्तुगीज गव्हर्नरचे (राज्यपाल) निवासस्थान होते आणि ते परेड ग्राउंडजवळच्या छोट्याशा टेकडीवर वसलेले आहे. घराचा दर्शनी भागाला मोठी गोथिक कमान आहे आणि हे घर डायोसीज ऑफ कोचीनचे 27 वे बिशप डॉम जोस गोम्स फेरेरियाच्या अखत्यारित होता ज्यांचे अधिकार क्षेत्र भारताच्या व्यतिरिक्त बर्मा, मलाया आणि सीलोनपर्यंत होते..
हो, आता फिरणे थांबविण्याची वेळ आलेली आहे. जुन्या काळाच्या आठवणींसह ज्या अजूनही तुमच्या मनात आहेत, मंत्रमुग्ध करणार्याय दृश्यांची झलक डोळ्यांमध्ये साठवताना आणि तुमच्या जिभेवर अजूनही देशी खाण्याची चव रेंगाळत असताना, जर तुम्हाला परत फिरायला जावेसे वाटले तर त्यात काही चूक नाही!
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|