|
|
|
|
तुमच्या त्वचेला नितळ बनविते आणि सर्व पेशींना चैतन्य आणि शक्ती देते ज्यामुळॆ तुम्हाला मिळते आदर्श आरोग्य आणि दीर्घायुष्य. ’ओजस’ (मूल शक्ती) वाढविते आणि ’सत्त्व’ (मानसिक शुद्धता) अधिक सुधारते आणि याद्वारे शरीराची प्रतिकारशक्ती वाढविते. यात अंतर्भूत आहे, औषधी तेल आणि मलमांद्वारे डोके आणि चेहऱ्याचा मसाज, औषधी तेलांनी वा पावडरने हातांनी आणि पायांनी शरीराचा मसाज, आंतरिक नवसंजीवन देणारी औषधे आणि औषधीयुक्त वाफेचे स्नान. वनौषधी स्नानही वापरले जाते. |
|
|
|
शरीर रक्षण आणि दीर्घायुष्य उपचार (कायकल्प चिकित्सा) :
वयानुसार होणाऱ्या बदलांना थांबविणारी ही मुख्य उपचारपद्धती आहे, जी शरीरातील पेशींचा क्षय थांबवते आणि व्यवस्थेचे रक्षण करते. यात अंतर्भूत आहे, रसायने घेणे (विशेष आयुर्वेदिक औषधे आणि आहार) आणि संपूर्ण शरीराची काळजी घेणारे कार्यक्रम. स्त्री-पुरुष दोघांनाही हे उपचार 50 वर्षे वयाच्या आत घेतल्यास अधिक लाभदायक असतात.
|
|
|
|
शरीर स्वेदन (स्वेद कर्म) :
औषधी वाफेच्या स्नानामुळे शरीरातील अशुद्धी नष्ट होते, त्वचेचा पोत आणि वर्ण सुधारतो, चरबी कमी होते, तसेच काही संधिवाताच्या रोगांमध्ये हे करण्यास सांगितले जाते, विशेषतः दुखणे कमी होण्यासाठी. खास वनौषधी आणि वनौषधींची पाने उकळवली जातात आणि ती वाफ संपूर्ण शरीराला रोज 10-12 मिनिटांसाठी दिली जाते. वनौषधी तेले आणि वनौषधी पावडरींनी हाताने केलेला मसाज तुमचे रक्ताभिसरण सुधारतो आणि स्नायूंना बल देतो.
|
|
|
|
बारीक होणे :
वनौषधी पावडर आणि वनौषधीयुक्त तेलाने मसाज, वनौषधी रस इ. सह आयुर्वेदीय आहार हे या कार्यक्रमाचा भाग आहेत.
|
|
|
|
सौंदर्याची काळजी :
वनौषधी फेस पॅक, वनौषधी तेलाचा मसाज, वनौषधीयुक्त चहा (हर्बल टी) इ. मुळे वर्ण सुंदर होतो आणि शरीर सुंदर होते.
|
|
|
|
मानसिक आणि शारीरिक आरोग्य (ध्यान आणि योग) मानसिक आणि शारीरिक व्यायामामुळे शरीर व मनापासून अहं वेगळा होतो – तुमची एकाग्रता वाढविण्यासाठी, तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी, प्रशिक्षणाच्या आठ पायऱ्या रचल्या गेल्या आहेत: 1. शिस्तबद्ध जीवन (यम) 2. आत्मशुद्धी (नियम) 3. शरीराची विशिष्ट स्थिती जसे पद्मासन (आसन) 4. श्वसनावर नियंत्रण (प्राणायाम) 5. इंद्रियांवर नियंत्रण (प्रत्याहार) 6. एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करणे (धारणा) 7. ध्यान 8. समाधी – अशी स्थिती जेथे तुम्ही अनुभवाल संपूर्ण शांती आणि कल्याण.
|
|
|
|
एकूण आरोग्य (पंचकर्म उपचार) :
शारीरिक आरोग्यासाठी पाच प्रकारचे उपचार – शरीर, अवयव, मन, श्वास, मज्जातंतू यांची एकतानता आणि रक्ताचे शुद्धीकरण.
|
|
|
|
|