वनौषधी तेले, औषधी दूध किंवा ताक आणि काढे यांची धारा कपाळ/ संपूर्ण शरीरावर एका विशिष्ट पद्धतीने सोडली जाते. याचे प्रकार आहेत, ऊर्ध्वांगधारा (डॊळ्यांच्या, कानाच्या आणि त्वचेच्या रोगांमध्ये लाभकर), तक्र धारा (स्मृतीभ्रंश, तीव्र डोकेदुखी किंवा वेड यासाठी) आणि सर्वांग धारा (डोके व शरीर दोहोंसाठी).
संधिवात, ल्युकेमिया इ. पासून आराम (स्नेहपानम ):
औषधी तूप विशिष्ट काळापर्यंत हळू हळू प्रमाण वाढवत पोटातून दिले जाते.
नाकपुड्या, तोंड व घसा कोरडे पडणे, तीव्र डोकेदुखी, चेहऱ्याचा अर्धांगवात आणि डोक्यात जळजळ (शिरोबस्ति) :
डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कोमट औषधी तेले डोक्यावर बांधलेल्या चामड्याच्या आवरणावर विशिष्ट काळासाठी ओतली जातात.
स्पॉन्डिलोसिस, सांधेदुखीचे आजार जसे संधिवात, अर्धांगवात, पक्षाघात, मज्जातंतूंचा दुबळेपणा, मज्जाविकार (पिझिचिल):
एका कोऱ्या तागाच्या कपड्याने कोमट वनौषधी तेल संपूर्ण शरीराला प्रशिक्षित मसाज करणाऱ्यांद्वारे एका लयबद्ध पद्धतीने रोज 1 ते 1.5 तास 7 ते 21 दिवसांसाठी लावले जाते.
पक्षाघात, अर्धांगवात, स्थुलता आणि काही सांधेदुखीच्या आजारांवरील उपचारांसाठी (उद्वर्तनम ):
वनौषधी चूर्णाने उपचार मसाज.
दुर्घटना किंवा अपघातामुळे उद्भवलेल्या स्नायु-अस्थि-संबंधित आजारावरील उपचारासाठी :
शरीराच्या संवेदनशील मुख्य बिंदूंवर काम करणारे उपचार (107 मर्मबिंदू).
नाकाच्या आजारांवरील उपचार. (नस्यम ):
औषधी पदार्थ, काढायुक्त तेले, तूप इ. श्वासाने आत घेणे ज्यामुळे डोके आणि मानेच्या भागातील विकृत घटक दूर होतील.
कानाच्या आजारांसाठी उपचार. (कर्णपूरणम):
औषधी तेले कानाला रोज 5-10 मिनिटांसाठी लावली जातात ज्यामुळे कान स्वच्छ होतो आणि विशिष्ट आजारांवर उपचारही होतात.
मोतिबिंदू टाळणे आणि दृष्टी सक्षम बनविणे (तर्पणम )
डोळ्यांसाठीचे उपचार जे मोतिबिंदू टाळणे आणि डोळ्यांच्या मज्जातंतूला सक्षम बनविणे यात गुणकारी आहेत.
स्नायूंचा क्षय, सांधेदुखी, खेळताना झालेली इजा, सांध्यांमध्ये वेदना, शरीर किंवा एखादा अवयव कृश होणे आणि काही प्रकारचे त्वचाविकार यांच्यावर उपचार (न्जावरकिझी)
औषधी तांदूळाचे शिजवलेले गोळे मलमलच्या पिशव्यांमध्ये बांधून ते लावून संपूर्ण शरीराचे स्वेदन केले जाते.
**कृपया ध्यानात ठेवा:
- प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून आयुर्वेदीय वैद्य एक स्वतंत्र कार्यक्रम तयार करून देतील.
- लहान आजारांसाठी जसे पाठदुखी, स्नायुदुखी, इ.साठी, अल्पकालीन उपचार जसे वनौषधींच्या वाफेचे स्नान, मज्जारज्जू स्नान, आणि औषधी मसाज वैद्यांच्या सल्ल्यानुसार दिला जाईल.
- स्त्रियांच्या शरीर मसाज आणि अन्य आरोग्य कार्यक्रमांसाठी स्त्री तंत्रज्ञ असतील.
- काही कार्यक्रम खूप वयस्कर किंवा खूप लहान (7 पेक्षा कमी) आजारी, हृदयरोगी आणि गरोदर स्त्रियांसाठी योग्य नसतात
- तुम्हाला हृदयरोगाचा किंवा रक्तदाब, रक्तशर्करा, जुने त्वचाविकार किंवा दमा यांचा पूर्वेतिहास असल्यास, कृपया वैद्यांना अगोदरच सांगा.
- आगाऊ वेळ निश्चित करणे चांगले.