|
|
|
|
|
|
सद्या |
|
|
|
सद्या ही केरळींची पारंपरिक शाकाहारी मेजवानी आहे. सामान्यतः हे दुपारचे जेवण असते, आणि यात शिजवलेला गुलाबी भात (विशेष केरळी भाताचा प्रकार), भाज्या वगैरे जोडीचे पदार्थ, तोंडी लावणी, लोणची आणि गोड पदार्थ हे सगळे केळीच्या पानावर वाढलेले असते. परंपरा सांगते की पानाचे निमुळते टोक जेवणाऱ्या अतिथीच्या डाव्या बाजूला यायला हवे.
या मेजवानीत प्रथम परिप्पू, तूप घालून केलेली डाळीची आमटी वाढली जाते. दुसरा पदार्थ म्हणजे सांबार, ही एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय आमटी आहे ज्यात उपलब्ध भाज्या या उकळलेल्या डाळ, कांदे, मिरच्या, कोथिंबीर, हळद आणि चिमुटभर हिंग यांच्या पातळ केलेल्या ग्रेवीमध्ये घातल्या जातात.
अवियल, हे एक नेमाने असणारी भाजी म्हणजे भाज्या, नारळाची पेस्ट आणि हिरव्या मिरच्यांचे मिश्रण असते. चमचाभर खोबरेल तेलात कढीलिंब घालून याला फोडणी देऊन लगेच आचेवरून काढून ढवळले जाते.
अन्य काही भाज्या म्हणजे थोरण आणि ओलन. थोरण म्हणजे वालाचे दाणे, कोबी, मुळा आणि चणाडाळ यांना वाटून त्यात खोवलेला नारळ आणि लाल मिरची आणि हळद घालून परतून केलेली भाजी. ओलन ही एक तशी कमी मसालेदार पाककृती असून त्यात भोपळा आणि तूर डाळ नारळाच्या दुधाच्या पातळ ग्रेवीमध्ये शिजवले जातात.
तोंडी लावण्यात असते उप्परी, पप्पडम, आल्याचे लोणचे, पचडी आणि खिचडी. उप्परी म्हणजे तळलेले केळ्याचे काप. पप्पडम म्हणजे वाळवून मग तळलेले पिवळ्या रंगाचे उडदाचे पापड. आल्याचे लोणचे म्हणजे गडद बदामी रंगाची तिखट गोड आल्याची चटणी असते आणि खिचडी म्हणजे काकडी किंवा भेंडीचे काप परतून दही घालून वरून मोहरी, लाल मिरच्या आणि कढीपत्त्याची खोबरेल तेलाची फोडणी घालून बनवले जाते. लोणची बऱ्याचदा आंबा किंवा लिंबाची असतात.
गोड पदार्थ जेवणातच वाढले जातात. पायसम हा एक दाट द्रव पदार्थ असून यात गोड बदामी पाक, नारळाचे दूध आणि मसाले घालून काजू आणि बेदाण्यांनी सजवले जाते. पायसमचे आणखी प्रकारही असू शकतात जसे पालड पायसम आणि परिप्पू प्रधमन्ा
पाझम, पिकलेले सोनेरी पिवळे केळेही पायसम बरोबर दिले जाते. पायसम नंतर, पुन्हा एकदा मसालेदार रसम सह भात वाढला जातो. रसम म्हणजे पातळ चिंचेच्या पाण्यात तिखट आणि मिरपूड वगैरे घालून उकळवून केलेली आमटी. कालन म्हणजे हळद आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी दिलेले ताक आणि साधे आंबट ताक ज्यात मीठ आणि बारीक कापलेली हिरवी मिरची आणि आले घातलेले असते हेही मेजवानी संपताना दिले जाते. खास केरळी पदार्थ .
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|