|
|
|
|
|
|
कुमरकम – आरटीचे केरळमधील पहिले परीक्षण क्षेत्र |
|
|
|
|
|
|
|
या संकल्पनेने कमी कालावधीतच आपला प्रभाव दाखवून दिला आणि आजही राज्यात ही संकल्पना सफ़लतापूर्वक चालू आहे.कुमरकम, वायनाड, कोवलम तसेच तेक्कडि ही चार प्रमुख पर्यटन स्थळे आता केरळमधील आवडीची जबाबदार पर्यटन केंद्रे (आर.टी. सेंटर्स) बनली आहेत. या स्थानांमधील प्रमुख तसेच गौण क्षेत्रांमध्ये जबाबदार पर्यटनाद्वारा केली गेलेली प्रगती उल्लेखनीय आहे.
कुमरकम हे भारतातील केरळ राज्यातील, कोट्टयम जिल्यातील एक पर्यटन गाव आहे. हे स्थान अनेक प्रहारचे जीव-जंतू, तसेच वनस्पती, कॄषि क्षेत्र आणि मत्य व्यवसाय यांचे आश्रयस्थान आहे.आपल्या सुसंतुलित उष्ण कटिबंधीय वातावरणामुळे कुमकरम विश्व-पर्यटनाच्या यादीतील एक अनोखे पर्यटन स्थळ बनले आहे.
जैवमंडलीय वैशिष्ट्ये
- येथील पक्षी अभयारण्यात 91 प्रकारचे स्थानिक पक्षी तसेच 50 प्रकारचे प्रवासी पक्षी येतात.
- 1970 तसेच 80च्या दशकाच्या सुरवातीला हे नाइट हेरन्स (रात बगळे) या पक्षांचे एकमेव प्रजनन स्थळ होते.
- हे अनेक प्रकारच्या माशांचा आहाराचे क्षेत्र तसेच प्रजनन क्षेत्र आहे.
- येथे अनेक सदाबहार प्रजाती आढळतात, ज्यापैकी तीन तर केवळ कुमरकम येथेच आढळून येतात.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|