Trade Media
     

कुट्टनाडु


हे केरळमधील प्रमुख तांदळाचे कोठार आहे, जेथे भाताची शेते दूरवर रम्य बॅकवॉटरमध्ये मिसळलेली आढळतात आणि अविस्मरणिय दृश्य उभे करतात.

कुट्टुनाडु, केरळमधील तांदळाचे कोठार शेतकरी वसाहतीशी निगडित आहे, ज्यांचे त्यांच्या भौगोलिक परिस्थितीशी सुसंवादाचे सूर आहेत. समुद्र पातळी खाली (अंदाजे 4 ते 10 फूट) केल्या जाणार्‍या शेतीसाठी ओळखल्या जाणार्‍या ह्या कुट्टनाडु भूमिचा स्वत:चा एक सामाजिक-सांस्कृतिक धागा आहे. केरळमधल्या चार प्रमुख नद्या पंपा, मिनाचिल, अचंकोविल आणि मणिमाला ह्या प्रदेशातून वाहतात. 

राष्ट्रीय महामार्ग-47 वर असणार्‍या स्थानांहून कुट्टनाडुला पोहचता येते. अलप्पुझा जिल्ह्यातल्या हरिप्पाडहून अलप्पुझा शहरापर्यंत आणि कोट्टयम जिल्ह्यातून जाणार्‍या मेन सेंट्रल (एमसी) मार्गावरच्या तिरुवल्ल आणि चंगनसेरी स्थानांहून.

कुट्टनाडुला पोहचण्याचा सगळ्यात प्रचलित मार्ग आहे अलप्पुझा-चंगनेसरी मार्ग. हा रस्ता कुट्टनाडुच्या महत्वाच्या भागांमधून जातो आणि कुट्टनाडुमधील दैंनंदिन जीवन पहाण्याचे पुष्कळ पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून देतो. कुट्टनाडुला भेट देणार्‍यांसाठी असलेली एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, ते गावांमध्ये जाण्यासाठी अलप्पुझा-चंगनेसरीच्या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी उतरून जाऊ शकतात, जेथे प्रामुख्याने शेतकरी रहातात. सुगीच्या (धान्य कापण्याच्या) दिवसांमध्ये कुठे कुठे नारळाच्या झावळ्यांनी सजलेल्या दूरवर पसलेल्या भाताच्या शेतांमध्ये कापणीशी निगडित पारंपरिक शेतीच्या कामात शेतकरी व्यग्र असतात. सकाळी सकाळी एका बाजूला बायका त्यांचे जेवणाचे डबे आणि कोयता घेऊन भाताच्या शेतांकडे जाताना दिसतात तर दुसर्‍या बाजूला पुरुष  आधीच शेतावर जाऊन शेत नांगरताना, बीज पेरताना, गवत काढताना, पाणी दुसरीकडे वळविताना इत्यादी करताना दिसतात.

कुट्टनाडुचा भाग पक्ष्यांच्या संख्येच्या बाबतीतही समृद्ध आहे, आणि पोपटांचे थवे भाताच्या शेतांमध्ये घिरट्या घालताना तुम्हाला पहाता येऊ शकतात, विशेषकरून त्या शेतांमध्ये जेथे भाताचं पीक आलं आहे. तुम्हाला काळी घोंगडी आकाशातून चालत असल्यासारखी वाटू शकते, जी जवळून पाहिल्यावर लक्षात येते की पक्ष्यांच्या आणखी एक थवा आहे. तुम्ही इथे कुट्ट्नाडु आणि जवळपासचे बॅकवॉटर आणि वेम्बनाडूमध्ये भटकणारे तीर पक्षी पक्षीसुद्धा पाहू शकता.

गावांमध्ये फिरायला गेल्यावर, कुट्टनाडूमध्ये असलेले असंख्य कालवे पहायला विसरू नका, ज्यांच्या किनार्‍यांवर रांगेत हवेवर डुलणारी नारळाची झाडे आहेत. दिवसभरात अनेकदा हे कालवे वेगवेगळ्या क्रियांचे केंद्र बनलेले असतात. होड्यांवर फेरीवाले असतात जे ह्या कालव्यांच्या किनार्‍यांवर रहाणार्‍यांना भाज्या, किराणा आणि मासे विकतात. तुम्हाला केट्टुवल्लम म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोठ्या शहरी होड्याही पहायला मिळतील ज्यातून मोठ्या प्रमाणात नारळाच्या साली, तांदूळ इत्यादी जवळच्या बाजारपेठेत नेल्या जातात. कुट्टनाडूच्या बॅकवॉटरवरील दृश्यांपैकी सगळ्यात आकर्षक दृश्य म्हणजे सहाजिकच येथील बदके, जी एकत्रितपणे खूप मोठ्या आवाजात कलकल करतात आणि मोठ्या संख्येने बॅकवॉटरमध्ये विहार करतात; छोट्या होड्यांमध्ये बसलेली माणसे त्यांना हाकतात. तुम्हाला बॅकवॉटरवर नियमितपणे जाणारी माणसे; काही पाण्याच्या खाली जाऊन लाईम शेल्स गोळा करताना आणि अन्य त्यांच्या जाळ्याच्या सहायाने आणि पारंपरिक वेताची टोपली ओट्टलच्या साहय्याने मासे पकडताना पहायला मिळतील.

जर तुम्हाला स्थानिक पदार्थ खाण्यात रस असेल तर तुम्ही रस्त्यांच्या शेजारी पारंपरिक पद्धतीने उभारण्यात आलेल्या ढाब्यांवर थांबू शकता जे बॅकवॉटरचे मासे आणि ट्रॅपिओकापासून बनलेल्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. नैसर्गिकरीत्या काढलेले प्रसिद्ध पेय आहे टॉडी, जे पुष्कळ प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याच्या विशेषतेसाठी खूपजण त्याचा आस्वाद घेतात.

जर तुम्ही होडी भाड्य़ाने घेतलीत, तर कुट्टनाडूची भेट आणखी उत्साहवर्धक होऊ शकते. तुम्ही अलप्पुझामधल्या KSRTC बस स्थानकाजवळून सरकारी आणि खाजगी समूहांद्वारे चालविल्या जाणार्‍या मोटरबोट किंवा हाऊस बोट भाड्याने घेऊ शकता किंवा त्या अल्प्पुझा-चंगनसेरी मार्गावर असलेल्या किडंगरहूनही आणता येतात. नेदुमुडी, कावलम, चंपक्कुलम इत्यादी कुट्टनाडु भागातली अन्य प्रेक्षणीय स्थळे आहेत.

इथे जाण्यासाठी:
  • जवळचे रेल्वे स्थानक: अलप्पुझा.
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेदुम्बसरी, अलप्पुझापासून अंदाजे 85 किमी.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia