पर्यटनाचे सकारात्मक परिणाम वाढविण्यासाठी आणि नकारात्मक कमी करण्यासाठी उपाय म्हणून, जबाबदार पर्यटन (आरटी) आज जगभरात पुष्कळ प्रमाणावर स्वीकारले गेले आहे. भारतात ही संकल्पना प्रथम रुजवत आहे, केरळ पर्यटन. आरटी प्रथम कार्यान्वित करण्याचा मान मिळाला आहे राज्यातील कुमरकम जिल्ह्यास. पर्यटनाच्या या सर्वसमावेशक रूपामुळे पर्यटक, यजमान दोघांना मदत होत आहे आणि व्यापारामुळॆ पर्यटनाचा पूर्ण लाभ मिळत आहे व तेही जैवमंडलीय किंवा सामाजिक रचनेला धक्का न लागता.यातही खास गोष्ट अशी की, आरटीमुळॆ स्थानिकांना अधिक चांगली जीवनशैली मिळत आहे. कुमरकममधील यशानंतर राज्यातील अन्य पर्यटन स्थळीही आरटी कार्यान्वित केले जात आहे.