|
एखाद्याच्या आयुष्यातील आठवणी जपून ठेवण्यासाठी स्मृतिचिन्हे असतात. या आठवणी काहीही असू शकतात. आणि विषय प्रवासाचा असेल, आणि त्यातही जर केरळ सारख्या खास ठिकाणी प्रवास असेल, तर स्मृतिचिन्हांना फारच महत्त्व येते.
केरळमध्ये, प्रवाशांना अनेक प्रकारची स्मृतिचिन्हे मिळू शकतात ज्यात तेथील संस्कृती, इतिहास, कला आणि सामाजिक-धार्मिक पैलू प्रतिबिंबित होतात.
केरळ स्मृतिचिन्हांमध्ये हाताने बनवलेल्या वस्तूंचा एक मोठा खजिनाच आहे. त्यात प्रसिद्ध आहे, आरन्मुला कनडी (धातूचा आरसा); नारळाच्या करवंट्या, लाकूड, चिकणमाती, वेत यांच्यापासून बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू, भित्तिचित्रे, हॅन्डलूम (हातमागाची) उत्पादने, कसावू साडी (सोनेरी काठांची साडी).
केरळमध्ये, पर्यटक वैशिष्ट्यपूर्ण केरळ स्मृतिचिन्हे कल्चरल शॉपीमधून विकत घेऊ शकतात. या कल्चरल शॉपी केरळ सरकारच्या पर्यटन विभागाच्या अधिकृत एजन्सी आहेत. कल्चरल शॉपीमध्ये, पर्यटक अनेक स्मृतिचिन्हे किंवा भेटवस्तू निवडू शकतात जसे, उरुली (वोक), पारा (पारंपरिक मापाच्या भांड्याचे छोटे प्रतिरूप), केट्टुवल्लम (तांदुळाची नाव), आरन्मुला कनडी (धातुचा आरसा), नेट्टिपट्टम (हत्तींच्या सजवलेल्या झुली) नॆटूर पेट्टी (पारंपरिक दागिन्यांची पेटी) इत्यादि.
|
|