Trade Media
     

वट्टवडा


या महिन्यात केरळमधील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन असलेल्या मुन्नारपेक्षा कमी गर्दी असलेल्या वट्टवडा येथे जाण्याचा कार्यक्रम ठरवा. मुन्नारच्या पूर्वेस  45 किमी दूरीवर असलेले वट्टवडा हे एक शांत, सुरम्य असे गाव आहे. मुन्नारमधील अन्य स्थळांच्या तुलनेत वट्टवडामध्ये चहाच्या मळ्यांखेरीज आपल्याला इतर प्रमुख भाज्या देखील येथील शेतांत पहावयास मिळतील, ज्या वट्टवडाच्या पर्वतांच्या उतरणीवर आणि घाटांमध्ये पिकवल्या जातात.

वट्टवडाचे सुरम्य पर्वतीय क्षेत्र समुद्रसपाटीपासून साधारण  6500 फ़ूट उंचावर पसरलेले आहे. येथे येणे हा एक ताजातवाना करणारा अनुभव असतो आणि अजूनही ह्या ठिकाणावर पर्यटकांच्या नजरा आणि पावले वळलेली नाहीत. याठिकाणी मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असून  हिवाळ्यात देखील येथील तापमान असह्य होण्याइतके खाली कधीच जात नाही. उतरणींवर आढळणार्‍या भाज्यांच्या शेतीखेरीज तुम्हाला येथे निलगिरी आणि शंकुधर(कोनिफ़र) वृक्षांनी युकत जंगलेदेखील आढळतील. हे स्थान पक्षांचे आधारस्थान तर आहेच, पण याचबरोबर तुम्हाला येथे अनेक जातींची, विविध आकाराची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे देखील पहावयास मिळतील.

वट्टवडा ट्रेकिंगसाठी एक उपयुक्त स्थान मानले जाते.ट्रेकिंगसाठी अत्यंत उत्सुक असणार्या  व्यक्तीला येथील आजूबाजूच्या कित्येक ठिकाणांचा ट्रेकिंगसाठी शोध लावता येईल.  वट्टवडापासून सुरू होणारे काही ट्रेकिंगचे रस्ते पुढे कोडाईकॅनाल, टॉप स्टेशन, माट्टूपेट्टी, कंथलूर, मीसापुलीमला येथे जाऊन मिळतात. यातील बहुतांश ठिकाणे ही रोमांचकारी ट्रेकिंगने भरलेली तर आहेतच पण याचबरोबर विविध प्रकारच्या वनस्पती आणि जीव-जंतूंच्या अनेक प्रजातींनी हे ठिकाण समृद्ध आहे. पर्यटक येथे मांऊंटन जीप सफ़ारी, मांऊंटन बाइकिंग, जंगल कॅंपिंग यांसारख्या रोमांचक कार्यक्रमांचाही आनंद घेऊ शकतात.या सर्व कार्यक्रमांचे संचालन जवळील खाजगी संस्थांद्वारे केले जाते. 

वट्टवडाच्या स्थानिक रहिवाशांमध्ये आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची जीवनशैली, त्यांच्या कलेची विभिन्न रूपे, भाषा, प्राकृतिक चिकित्सा विधी यांसारख्या गोष्टींमध्ये वट्टवडा येथे येणार्यार पर्यटकांची रूची असते.

येथे पोहोचण्यासाठी:
एर्नाकुलम्  आणि कोट्टयमपासून मुन्नारपर्यंत रस्त्याद्वारे पोहोचता येते.
  • जवळचे रेल्वे स्थानक: मुन्नारपासून साधारण 130 किमी दूर अंतरावर असलेले एर्नाकुलम जंक्शन.
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुन्नारपासून साधारण  110 किमी दूर अंतरावर.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia