Trade Media
     

कालक्कयम धबधबा


हा पावसळ्याचा मोसम आहे आणि केरळमधल्या नद्या आणि जलस्त्रोतांना नवे जीवन प्राप्त झाले आहे. पावसाळ्याच्या मोसमात जंगलात जायला तुमची काही हरकत नसेल आणि थोडा धोका पत्करून तुम्ही धबधब्याला त्याच्या अलौकिक रूपात पाहू इच्छित असाल तर थिरुवनंतपुरम जिल्ह्यातल्या इडिंजार जवळ असलेल्या जंगलांमध्ये वसलेला कलक्कयम धबधबा पहा.

थिरुवनंतपुरमहून कलक्कयमला जाण्यासाठी, तुम्हाला व्हाया पलोड यावे लागेल जे शहरापासून अंदाजे 35 किमी आहे. पलोडहून वळून पेरिंगमलाला या. पेरिंगमलाहून उजव्या बाजूला वळा आणि व्हाया इंडिजार 12 किमी दूर असलेल्या कुरुस्सदीला पोहचा. कुरुस्सदीहून पुढे धबधब्यावर जाण्यासाठी साईनबोर्ड्स लावलेले नसल्यामुळे तुम्ही स्थानिक लोकांना विचारून धबधब्याच्या ठिकाणी पोहोचू शकता.

कलक्कयम धबधाबा आणि त्याच्या सभोवतालच्या दृश्यांचे वर्णन शब्दांत करता येण्यासारखे नाही. का धबधबा अगस्त्यवनम जंगलातून उगम पावणार्‍या मानकयम प्रवाहाचा एक भाग आहे. धबधब्याच्या तळाशी बनविलेल्या कुंडात आंघोळ करून तुम्ही तुमच्या शरीराला ताजेतवाने बनवू शकता. प्रवाहाला ओलांडून धबधब्यावर जाताना काळजीपूर्वक पावले टाकावी लागतात कारण खडकांवर जमलेल्या शेवाळीमुळे ते निसरडे बनतात.

धबधब्याजवळ असलेले जंगलही पक्षी आणि जीव जंतु आणि वनस्पतींच्या अन्य प्रजाती पहाण्यासाठी चांगले ठिकाण आहे. ज्यांना थोडे चालायला आवडत असेल त्यांना प्रवाहाच्या किनार्‍याने चालत सभोवतालच्या दृश्यांचा आनंद घेता येऊ शकतो

येथे पोहोचण्यासाठी:
  • जवळचे रेल्वे स्थानक: थिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक, अंदाजे 50 किमी
  • जवळचा विमानतळ: थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, अंदाजे 60 किमी


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia