Trade Media
     

नीलकुरिंजी ब्लूम


केरळमध्ये अनेक नैसर्गिक चमत्कार आहेत ज्यात आहे बारा वर्षांत देवाच्या या देशात रंग भरले जाणारे हे चित्र. दंतकंथांच्या या मुन्नार पर्वतावर बारा वर्षांत एकदा फुलणाऱ्या या नीलकुरिंजीच्या घटनेला वनस्पतिशास्त्रज्ञांद्वारे स्ट्रोबिलैंथिस कुंथिएनम म्हटले जाते. 40 पेक्षा विविध प्रकार असलेली ही फुले सर्व निळ्या रंगाची असतात म्हणूनच स्थानिक भाषेत त्याचे नाव पडले आहे, नील म्हणजे निळे आणि कुरिंजी म्हणजे फूल  

यावर्षी, बारा वर्षांनी मुन्नारच्या पर्वताने नीलकुरिंजीचे स्वागत केले आहे. स्थानिक आदिवासींकडून पूजले जाणारी आणि पर्यटकांसाठी आकर्षण असलेली फुले ऑगस्टमध्ये फुलतात आणि ऑक्टोबरपर्यंत असतात.

एकदा मुन्नारमध्ये पोहोचल्यावर तुम्ही नीलकुरिंजी कोविलूर, कडवरी, राजमला, लुप्तप्राय पर्वतीय प्राणी ‘नीलगिरी वाघांची’ वस्ती असलेले इरवीकुलम नेशनल पार्क आणि मुन्नारच्या आजुबाजूची ठिकाणे येथे नीलकुरिंजी पाहू शकता. निसर्गप्रेमी आणि पर्यटनप्रेमींनी आपला मोर्चा कधीच मुन्नारकडे वळवला आहे हा बारा वर्षांतून एकदा येणारा योग पाहण्यासाठी.

नीलकुरिंजीच्या विस्तीर्ण बहरात उभे राहणे हा एक रोमांचक अनुभव असतो. भूमीच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीनुसार नीलकुरिंजीचे उंचीचे प्रकार असतात. साधारणपणे लहान रोपे (साधारण 2 फुटी) उंचीवर आणि उंच रोपे (5 ते 10 फुटी) कमी उंचीवर आढळतात.

अनेक टूर कंपन्या, साहस क्लब इ. पर्यटकांसाठी मुन्नारमधील काही स्थानिक ठिकाणी पोहोचून नीलकुरिंजी पाहण्याचे गिर्यारोहणाचे कार्यक्रम आयोजित करतात.

येथे पोहोचण्यासाठी:
  • जवळचे रेल्वे स्थानक: एर्नाकुलम, साधारण 145 किमी दूर
  • जवळचा विमानतळ: कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, साधारण 110 किमी दूर.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia