Trade Media
     

पडन्ना बॅकवॉटर


केरळमधील बहुतेक बॅकवॉटर ठिकाणे ही राज्याच्या दक्षिण आणि मध्य प्रदेशात वसलेली आहेत. मात्र याला अपवाद म्हणजे, फुटनोट्स, हा महिना तुम्हाला नेत आहे केरळच्या उत्तर भागातील कासरगोडमधील बॅकवॉटर जाळ्याकडे. येथे वलियपरम्बु  बॅकवॉटरच्या काठावर आहे सुंदर बॅकवॉटर गाव तेक्केकडु, ज्याची कहाणी खास आहे. ही कहाणी आहे पडन्नाच्या स्वयंरोजगाराच्या प्रयत्नांची आणि श्री. गुल महम्मद आणि त्यांचे पडन्ना येथील बॅकवॉटर रेट्रीट – ऑयस्टर ओपेरा याची. 

नारळाच्या झाडांच्या रांगांमध्ये आणि कालव्यांच्या जाळ्यात, बॅकवॉटरच्या मंद झुळकांमध्ये असलेल्या या रेट्रीटमध्ये सर्व काही नैसर्गिक आहे. हे रेट्रीट पडन्ना येथे चेरुवथुर, कासरगोड जिल्हा येथे आहे.

एका माणसाच्या गावकऱ्यांना रोजगार मिळवून देण्याच्या इच्छेतून हे रिट्रीट निर्माण झाले आहे आणि हे केरळमधील पहिले थीम विलेज आहे. पडन्नाच्या ऑयस्टर ओपेराची थीम आहे ऑयस्टर फार्मिंग. हे आता हजारोंच्या उपजीविकेचे साधन बनले आहे आणि नैसर्गिक वातावरणात सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांसाठी उत्तम आहे.

ऑयस्टर ओपेरामधील सुविधा या स्थानिक लोकांच्या सांस्कृतिक आणि पारंपारिक जीवनाचे प्रतिबिंब आहेत. येथे गावकरीच यजमान आहेत. संपूर्ण परिसरात आधुनिक रिसॉर्टप्रमाणे आधुनिक सुविधा नाहीत मात्र पर्यटका येथे पाऊल टाकल्यापासून निरोप घेईपर्यंत प्रत्येक क्षणाला प्रशंसेची बरसात करतात. मात्र पडन्नाचा निरोप घेणे तेवढे सोपे नाही. कारण येथे मिळणारे आतिथ्य आणि आनंदच असा आहे. 

आधी सांगितल्याप्रमाणे, पाहुण्यांना मिळणाऱ्या प्रत्येक सुविधेला नैसर्गिकतेचा स्पर्श असतो. मग ती रेस्टॉरन्ट्स असोत, जेथे तुम्ही स्थानिक चवदार पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. ज्यात हिरवे कालवे आणि शिंपल्यांचा समावेश असतो किंवा मग तुमची राहण्याची जागा किंवा टॉयलेट, बाथरूम असो. सध्या ऑयस्टर ओपेरामध्ये जमिनीवरील 3 कॉटेजिस, एक फ्लोट हाऊस, एक एलेवेटेड हाऊस ज्यात आहे सुसज्ज स्वयंपाकघर दोघांची निवासाची सोय, वरांडा, टॉयलेट आणि बाथरूम.

एकदा पडन्नाला गेल्यावर, तुम्ही गावाचा कोपरा न कोपरा स्वतः पाहू शकता. पडन्नाचे खारे पाणी आणि भोवतालची गावे यांना सुंदर निसर्गाचे वरदान आहे. रेट्रीटजवळच्या पाम वृक्षांनी आणि नारळांनी आणि झाडाझुडपांनी वेढलेल्या बेटांनाही भेट देऊ शकता. किंवा तुम्ही ऑयस्टरमधील दैनंदिन कामांमध्ये किंवा सीवुड फार्मिंगमध्ये गुंतलेल्या गावकऱ्यांसह गप्पा मारू शकता किंवा शिंपले पकडणे किंवा कालवे पकडणे जवळून पाहू शकता. जवळचे दीर्घ समुद्र किनारे आणि नदीमुखे पाहण्याजोगी आहेत आणि जवळच्या काही बेटांवर जंगली बीवरही पहायला मिळू शकते.  पडन्नाचे बॅकवॉटर पाच नद्यांनी बनतात ज्या नद्या अरबी समुद्राला मिळतात.

पडन्नाला पर्यटक हाऊस बोटमधील किंवा कंट्रीबोटमधील मनोरंजक क्रूजचा किंवा वलियापरम्ब किनाऱ्यावर किंवा नदीमुखावर सूर्यप्रकाश आणि वाळूचा आनंद घ्या किंवा पारंपारिक आयुर्वेद उपचारकांकडून कायाकल्प उपचार करून घ्या, तेजस्विनी नदीत काठावरील जंगले आणि शेते पाहात विहार करा, दोऱ्यांनी, जाळ्यांनी किंवा नुसत्या हातांनी मासेमारी करणे शिका, किंवा कंट्री बोटीतून चांदण्यात नौकाविहार करा. पडन्नाजवळील आकर्षणे म्हणजे, बेकल किल्ला, परिस्सिनिक्कडवु मंदीर जे तेथील वेगळ्या धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध आहे, करीम जंगल, जे एका निसर्गप्रेमीच्या मालकीचे मानवनिर्मित जंगल आहे. मौसमात तुम्ही थेय्यम हा या प्रदेशातील प्रसिद्ध आणि सुंदर कलाप्रकारही पाहू शकता.   अधिक माहितीसाठी पाहा: www.oysteroperaatpadanna.com किंवा ईमेल करा: oystergul@rediffmail.com किंवा कॉल करा + 91 467 2278101.

येथे पोहोचण्यासाठी
  • जवळचा विमानतळ: मेंगलोर (120 किमी), कालिकत (180 किमी)
  • सर्वात जवळचे बस स्थानक: चेरुवथुर (9 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: चेरुवथुर (8 किमी)


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia