Trade Media
     

कुमरकम पक्षी अभयारण्य


स्थळ: कोट्ट्यम शहरापासून 16 किमी

कुमरकम गाव,वेम्बन्नाडू तलावाच्या किनार्‍यावरील छोट्या छोट्या द्वीपांचा समूह असलेला कुट्टनाडू प्रदेशाचा भाग आहे.14एकर परिसरात विस्तारलेल्या ह्या पक्षी अभयारण्यात वेगवेगळ्या जातीचे पक्षी पहायला मिळतात.

जर तुम्ही पक्षी प्रेमी असाल तर या अभयारण्याला जून आणि ऑगस्ट महिन्या दरम्यान भेट द्या. दलदलीच्या प्रदेशात रहाणारे पक्षी जसे की भारतीय पाणबुडा, छोटा करढोक, करकोचा आणि बगळ्याच्या विभिन्ना जाति, सफेद आइबिस, खंड्या पक्ष्याच्या अनेक जाति इ.चा हा प्रजनन काळ आहे. नोव्हेंबर आणि मे महिन्यात, अभयारण्यातील झुडुपे आणि वृक्ष काही दुर्मिळ स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांसाठी निवासीस्थान बनतात. पाणकोंबडॆ जसे की पिन टेल्ड बदक, गार्गेनी टील, स्पॉट बिल्ड बदक, शिकारी पक्षी जसे की आस्प्रे, मार्श हॅरीअर, स्टेपी गरुड इ.ना वेम्बन्नाडू तलाव आकर्षित करतो.

पक्षी प्रेमी, काइपुझा मुत्तु, पतिरमनल, नारकतरा, तोल्लयिरम कायल, पूतपंडी कायल येथे स्थानिक पक्षीजीवन आणि स्थलांतर करणारे पक्षी ज्यांच्या शंभराहून अधिक जाति आरामात पाहण्यासाठी बोट सहल करुन येऊ शकतात.

केरळ टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (केटीडीसी) बॅकवॉटर रिसॉर्ट वॉटरस्केप्स हे अभयारण्याजवळ असून तेथे स्वंतत्र रुपात कॉटेजेस उपलब्ध आहेत.

वेळ: सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी,केरळ टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(केटीडीसी) कार्यालयाशी संपर्क करा:
  • फ़ोन: + 91 481 2525864
  • फ़ॅक्स: + 91 481 2525862

येथे पोहोचण्यासाठी:
  • जवळचे रेल्वेस्टेशन: कोट्ट्यम,साधारण 16 किमी
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोट्ट्यम शहरापासून साधारण 76 किमी दूर.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia