Trade Media
     

परम्बिकुलम वन्यजीवन अभयारण्य


स्थळ: पालक्कड पासून 110 किमी दूर.

परम्बिकुलम तामिलनाडूच्या अनामलई आणि केरळच्या नेल्लियापति पर्वत रांगात निवांत हिरवळ असलेले मरुद्यान आहे.पश्चिम घाटात हे परम्बिकुलम वन्यजीवन अभयारण्य 285 चौ.किमी क्षेत्रात पसरलेले आहे.

केरळच्या दुर्लभ वृक्ष-वेली आणि प्राणिजाति याने युक्त हे अभयारण्य एक अनोखा अनुभव देते. मलयर, कादर, मुथुवन सारख्या काही थोड्या पर्वतीय जाति ह्या परम्बिकुलमच्या जंगलात रहातात. येथे निलगिरी माकड, सिंहाच्या शेपटीसारखी माकडे, वाघ, निलगिरी टार, एशियन हत्ती, ठिपकेदार हरिण, भारतीय जंगली कुत्रे, साप आणि कोळ्यांच्या विविध जाती, पक्ष्यांचे असंख्य प्रकार अशा सर्व प्राणीजातींचा समावेश आहे,

ह्या अभयारण्यात झाडांच्या वेगवेगळ्या जाती मुख्य्त: साग,नीम,चंदन आणि रोजवुड आहेत.सर्वात जुना उंच साग वृक्ष ’कन्निमरी’ येथे आहे.

परम्बिकुलम जलाशयात नौकाविहाराची व्यवस्था केली जाते.अभयारण्यात वन-अधिकार्‍यांच्या परवानगीने ट्रेकिंग करता येते.परम्बिकुलमचे मुख्यालय तूनक्कदवुच्या आरक्षित जंगलात एक ट्री-हाऊस आहे जेथे आगाऊ बुकिंग करता येते.तूनक्कदवु,थेल्लिक्कल आणि इलाथोडच्या राज्य वनविभागाच्या विश्रांतीगृहात रहाण्याची व्यवस्था आरामदायी आहे.

येथे पोहोचण्यासाठी: परम्बिकुलम येथे पोहोचण्यासाठी तामिळनाडूतील पोल्लचीपासून रस्तामार्ग आहे.पाल्लक्कड-पोल्लची हा मार्ग 45 किमीआहे आणि पोल्लची-परम्बिकुलम हा मार्ग 65 किमी आहे.

  • जवळचे रेल्वेस्टेशन: पोल्लची साधारण 65 किमी
  • जवळचा विमानतळ: तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर साधारण पाल्लक्कड पासून 55 किमी.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia