Trade Media
     

पीची-वाझनी वन्यजीवन अभयारण्य


निसर्ग प्रेमींसाठी त्रिशूर जिल्ह्यातील पीची-वाझनी वन्यजीवन अभयारण्य हे चांगले ठिकाण आहे.

त्रिशूर जिल्ह्यातील पीची-वाझनी वन्यजीवन अभयारण्य 1958 मधे उभारण्यात आले आहे. हे अभयारण्य त्रिशूरपासून साधारण 20 किमी पूर्वेला असून 125 चौ.किमीआहे आणि पीची आणि वाझनी धरणाच्या जल ग्रहण क्षेत्रात आहे. हे अभयारण्य पलपल्ली-नेल्लियमपति जंगलाचा भाग आहे आणि चिम्मिनि अभयारण्याची उत्तरी सीमा तयार करतो.

निसर्ग प्रेमींसाठी हे ठिकाण मोहक वनस्पतीसृष्टीची आणि प्राणीजातीची विपुलता तसेच तलावातील जलविहार यामुळे वरदान ठरले आहे. येथे 50 हून अधिक जातीची ऑर्किडस, अगणित दुर्मिळ औषधी वनस्पती, साग, रोजवूड इ.पहायला मिळतात.प्राणीजातीची विविधता यामधे जवळजवळ 25 प्रकारचे सस्तन प्राणी ज्यात चित्ता, वाघ, रानमांजर यासारखे मांसभक्षक प्राणी आणि सांबर हरिण, बार्किंग हरीण, ठिपक्यांचे हरिण, भारतीय रानगवा आणि एशियन हत्ती यासारखे शाकाहारी प्राणी समाविष्ट आहेत.पक्ष्यांच्या 100 हून अधिक जाति आणि सर्प व सरड्याच्या विविध जाती येथे आढळतात.

अभयारण्यातील सर्वात उंच शिखर पोन्मुंडी 923 मी. उंच आहे. येथे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 3000 मिमी आहे.

पर्यटकांसाठी, विश्रामगृहामधे रहाण्याची सोय उपलब्ध असून माहिती केंद्र पीची येथे आहे.

येथे पोहोचण्यासाठी:
रस्तामार्ग: त्रिशूरपासून सरळ पीचि पर्यंत बस उपलब्ध आहेत.
  • जवळचे रेल्वेस्टेशन: त्रिशूर.
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, 98 किमी दूर.

अधिक माहितीसाठी संपर्क:
दी चिफ़ कंझर्व्हेटर ऑफ़ फ़ॉरेस्ट (वाइल्डलाइफ़)
थिरुवनंतपुरम 696 014
टेलीफ़ॅक्स: + 91 471 2322217

दी वाइल्डलाइफ़ वॉर्डन
पीची वन्यजीवन अभयारण्य, पीची पीओ
जिल्हा त्रिशूर
फ़ोन: + 91 487 2282017


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia