Trade Media
     

निलम्बूर: मल्लपुरममधील सागवानी लाकडा


स्थान: उत्तर केरळमधील मल्लपूरम जिल्यातील मल्लपूरम शहरापासून 40 किमी

निलम्बूर हे जगातील सर्वात जुन्या सागवानी जंगलासाठी ओळखले जाते, जे शहरापासून केवळ 2 किमी दूर असलेल्या कोलोनी प्लॉट येथे आहे. हे ठिकाण आदिवासी वस्त्या, जगातील पहिले सागाचे संग्रहालय, विशाल वर्षा वने, धबधबे आणि प्राचीन कोविलाकोम – महाराजांची निवासस्थाने या सर्वांसाठी देखील प्रसिद्ध आहे.

सागवानी जंगलाला एच.व्ही.कोलोनी यांचे नाव देण्यात आले आहे, जे इंग्रजांच्या काळात मलबार या जिल्याचे कलेक्टर होते. यांनीच संपूर्ण नीलांबर प्रांतात सागाच्या वनांची लागवड करून घेतली होती. कोलोनींच्या हाताखालच्या पदावर काम करणार्या  चातू मेनन यांनी छोट्या वृक्षांचे रोपण करण्याचे कठिण कार्य आपल्या देखरेखीखाली पूर्ण केले होते.

सागाच्या वनांमधील कन्निमरी हा सर्वात प्राचीन वृक्ष हे कोनोलीच्या प्लॉटमधील एक विशेष आकर्षण आहे. हा भूखंड अरूवकोड येथील चालियार नदीच्या किनारी जवळपास, 2.31 हेक्टर क्षेत्रावर पसरलेला आहे. येथे होड्यांच्या मार्फ़त पर्यटकांना नदीच्या पलिकडे नेले जाते.

निलम्बुर शहरापासून चार किमी दूर अंतरावर असलेल्या गुडल्लूर रोडवर जगातील पहिले सागावानी वस्तूंचे संग्रहालय आहे. हे संग्रहालय केरळ वन अनुसंधान संस्थानाचे एक उपकेंद्र आहे. दुमजली इमारतीने युक्त अशा या संग्रहालयामध्ये आपण ऎतिहासिक,कलात्मक तसेच वैज्ञानिक महत्त्व असणार्या् वस्तू बघू शकता. येथे आपल्याला सागवानी लाकडाबाबत प्रत्येक प्रकारची माहिती दिली जाईल.

निलम्बुर शहरापासून केवळ 18 किमी दूर असलेले नेडुमकयम हे वर्षा वनांसाठी ओळखले जाते. येथे आपल्याला इंग्रजांकडून निर्मिलेल्या लाकडाच्या रेस्ट हाऊसपासून ते ह्त्ती, हरणे यांसारखी जनावरे देखील आढळून येतील. वन क्षेत्रीय प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. वन क्षेत्राला संरक्षित करण्यासाठी या प्रदेशात कडेकोट प्रतिबंधत्मक बंदोबस्त करण्यात येतो. याहून अधिक घनदाट वनप्रदेशात जाऊन, जीपमध्ये बसून साधारणतः अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या मनचेरी येथे आपण जाऊ शकता. चोलाई माइकर्स नावाच्या एका प्राचीन आदिवासी जमातीचे हे निवासस्थान मानले जाते.

येथे वलमथोडे च्या शिखरावर अजून एक प्राचीन आदिवासी जमातीची वस्ती वसलेली आहे, जेथे तुम्ही कोझिकोडपासून अरीकोड-मुक्कम रोड मार्फ़त पोहोचू शकता. वलमथोडे हे चातियार नदीच्या पलिकडे असून ते निलम्बुर पासून साधारण 27 किमी अंतरावर आहे.

निलम्बुर शहर कोविलाकोलम (प्राचीन काळच्या स्थानीय राजांचे अथवा शासकांचे निवासस्थान)च्या आपल्या समूहांसाठी देखील प्रसिद्ध आहे. ही संरचना आपल्या सुंदर अशा भित्तिचित्रांसाठी आणि काष्ठकलेसाठी प्रसिद्ध आहे. निलम्बुर पट्टू हा एक प्राचीन उत्सव आहे जो फेब्रुवारी महिन्यात असतो आणि तो कलमपट्टू किंवा जमिनीवर काढल्या जाणार्याि पारंपारिक रांगोळीसाठी ओळखला जातो.

येथे पोहोचण्यासाठी:
  • जवळचे रेल्वे स्थानक : निलम्बुर शोरनूर – निलम्बुर रेल्वे लाईनचे टर्मिनल्स आहे
  • जवळचा विमानतळ: कोझिकोड, जे मल्लपुरम शहरापासून साधारणतः 26 किमी दूर अंतरावर आहे.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia