Trade Media
     

चेट्टिकुलंगर भरणि


Event date:
स्थळ: चेट्टिकुलंगर भगवती मंदिर, कायमकुलम, अलप्पुझा जिल्हा

कुम्भमच्या मलयालम महिन्यात होणारा हा वार्षिक उत्सव केरळमध्ये प्रसिद्ध असलेला एक उत्सव आहे. हा उत्सव आणि मंदिर देवी भगवतीला अर्पित केले आहेत. दक्षिण केरळमधील जवळजवळ सर्व लोककला या मंदिरात सादर केली जाते. रात्रभर रंगणारे कथकलीचे सादरीकरण(कार्यक्रम) कथकलीच्या चाहत्यांनी पाहावेत असेच असतात.

अन्य काही नेत्रदीपक वैशिष्ट्यांमध्ये केट्टुकाझची मिरवणूक, कुथियोट्टम, पडायनी, कोलकली आणि अम्मनकुडमचा समावेश असतो. केट्टुकाज्झचा मिरवणूक समारंभ भक्तांची जास्त गर्दी खेचून घेतो ज्यामध्ये ठळकपणे सजविलेल्या रचना, उंच आणि मोठे समजले जाणारे घोडे आणि रथासाठी छोटे घोडे, नेत्रदीपक शोभायात्रेचा भाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो.

जाण्याचा मार्ग:
  • जवळचे रेल्वे स्थानक:अंदाजे 5 किमी दूर असलेले कायमकुलम
  • जवळचे विमानतळ: अलप्पुझापासून अंदाजे 85 किमी दूर असलेले कोचिन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ.

Unknown column 'issueid' in 'where clause'