Trade Media
     

आराट्टुपुझा पूरम


Event date:
स्थळ: आराट्टुपुझा मंदिर, त्रिशूर.

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात स्थित आराट्टुपुझा गाव सांस्कृतिक रूपाने खूपच उल्लेखनीय गाव आहे. हे गाव त्रिशूर  शहरापासून साधारण 15 किमी दूर स्थित आहे आणि वार्षिकोत्सव आराट्टुपुझा पूरमसाठी प्रसिद्ध आहे. श्री सास्ता मन्दिर मधे आयोजित हा उत्सव, ‘सेन्टर ऑफ नर्व’ च्या रूपात भगवान अय्यप्पांसाठी समर्पित आहे. असे मानण्यात येते की उत्सवाच्या दिवसात, श्री सास्ता मन्दिराचे ईष्टदेव भगवान अय्यप्पांना भेटण्यासाठी आसपासच्या गावातील देवी-देवता येतात.

केरळच्या आराट्टुपुझामधे आयोजित ह्या वार्षिकोत्सवाला त्याचे निखळ महत्व आणि भव्यतेमुळे सर्व पूरम उत्सवांच्या मातेचे नाव दिले गेले आहे. असे मानले जाते की श्री सास्ता मन्दिर 3000 वर्षापेक्षा अधिक प्राचीन आहे आणि ह्याच्या प्रांगणात अनेक उत्सव आणि उत्सव साजरे होतात.

उत्सव काळात, आसपास आणि दूर-दूरचे पर्यटक ह्या वैभवशाली उत्सवात आराट्टुपुझा गावात येतात. 7-दिवस चालणार्‍या ह्या उत्सवाच्या शेवटचे दोन दिवस उत्साह आणि भक्तिचा कळस गाठला जातो. उत्सवाच्या अंतिम संध्याकाळी सुसज्जित हत्तींची सभा आणि सामूहिक वाद्य-वादन केले जाते त्याला सस्तविंते मेलम असे संबोधले जाते.

सस्तविंते मेलममधे अनेक पारंपरिक दिवे लावले जातात आणि विशाल दंडधारी ज्वाला ज्याला स्थानीय रूपात थीवेट्टी म्हणण्यात येते. ह्या समारंभाच्या समाप्तिला जवळच्या मन्दिरातील ईष्टदेवाला घेऊन चालणार्‍या हत्तींच्या दलाला भव्य प्रदर्शनासाठी बाजूच्या धान्याच्या शेतात घेऊन जातात. ह्या भव्य प्रदर्शनात जय-जयकार करणार्‍या गर्दीत 61 हत्तींना ओळीत उभे केले जाते. पहाटेपासून हे स्थान सामूहिक वाद्ययंत्रांच्या स्वरांनी रोमांचित होऊन जाते. ह्या पारंपरिक सामूहिक वाद्ययंत्रांमधे पंचवाद्यम, पचरिमेलम आणि पंडिमेलम समाविष्ट असतात ज्यांना अधिक संभवित लय आणि तालासहित वाजविले जाते, जेव्हा मुतुक्कुड (चमकदार, भव्य छत्र्या) असलेले सुसज्जित हत्तींचे दल आणि वेंचमरम (सफेद झाड़ू)मुळे एक मनमोहक दृश्य बनते. हे हत्ती धैर्यपूर्वक उभे राहून गर्दीचे मनोरंजन करतात.


सूर्योदय झाल्यावर,जवळच्या मन्दिरातील ईष्टदेवांना घेऊन चालणार्‍या हत्तींना, ज्यांचा श्री सास्ता मन्दिरात समूह होत असतो, आराट्टु अनुष्ठानसाठी जवळच्या नदीवर नेले जाते.

हा एक धार्मिक पवित्रीकरण विधि आहे. ह्यात मूर्तिला नदीच्या पाण्यात विसर्जित करुन मंत्रोच्चार आणि पुष्प अर्पित करण्यात येतात. अंतिम दोन दिवसात आराट्टुपुझाचे ईष्टदेव भगवान अय्यप्पनच्या बरोबर आराट्टुचा विधि संपन्न होतो.

देवी-देवतांना एकत्र आणणार्‍या स्मृतिच्या रुपात हा आराट्टुपुझा पूरम साजरा केला जातो आणि विस्तृत अनुष्ठान आणि भव्यता यामुळे हा उत्सव  गर्दीला चमत्कारी रूपात आकर्षित करतो.

येथे जाण्यासाठी:
  • जवळचे रेल्वेस्थानक: त्रिशूर, साधारण 14 किमी
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्रिशूरपासून साधारण 58 किमी .

Unknown column 'issueid' in 'where clause'