Trade Media
     

कोडुंगल्लूर भरणि


Event date:
स्थळ : कोडुंगल्लूर भगवती मंदिर, कोडुंगल्लूर, त्रिशूर जिल्हा.

कोडुंगल्लूर येथील देवी भगवतीला समर्पित असलेले हे मंदिर वार्षिक भरणि सणासाठी प्रसिद्ध आहे. हे मूळ शंकराचे मंदिर असल्याचे मानले जाते कारण भगवती (देवी) ची पूजा करण्याआधी शंकराची पूजा केली जाते. कोडुंगल्लूर मंदिरातली भगवतीची प्रतिमा फणसाच्या झाडातून कोरून काढलेली असल्याचे मानले जाते. प्रतिमेच्या चेवर्‍यावर मुखवटा असतो आणि अनेक दागिन्यांनी सजविलेला असतो.

वार्षिक भरणि सणाच्या वेळी, कोडुंगल्लूर भगवती मंदिर अनेक क्रियांचा केंद्रबिंदू असते. कार्यक्रमांमध्ये सगळ्यात प्रेक्षणीय कार्यक्रम म्हणजे कवु तीनडल समारोह. हा समारोह ह्यात हजारोंनी सहभागी होणार्‍या तलवारधारींमुळे (स्थानिक भाषेत वेलिचप्पड म्हणतात) ओळखला जातो, ज्यात पुरुष आणि स्त्रिया दोघेही असतात, ज्यांना भक्तजन देवीशी संपर्क साधण्याचे माध्यम मानतात.

कोडुंगल्लूरमधला भरणि उत्सव हा शौर्य आणि विश्वास यांचा संगम आहे. हा उत्सव मल्याळम महिना मीनम (मार्च/एप्रिल) मध्ये साजरा केला जातो. कवू तीनडल हा मुख्य समारोह आहे ज्याला हजारो लोक उपस्थित रहातात आणि हा तरिपट्टुसाठी देखील ओळखला जातो, ज्यात मंदिरातल्या देवतेसाठी अशुभ गाणी गायली जातात.

दरवर्षी, यात्रेकरु आणि उत्सुक पाहुणे मल्याळम महिना मीनममध्ये कोडुंगल्लूर भगवती मंदिरातल्या ह्या सात दिवसांच्या वार्षिक सणाला हजेरी लावतात. वार्षिक भरणि सणाचा एक भाग असलेला कवु तीनडल समारोह कोडुंगल्लूर राजाच्या उपस्थितीत आयोजित केला जातो. ह्या समारोहाच्या दरम्यान, हजारो तलवारधारक (वेलिचप्पड) त्यांच्या तलवारी हवेत उंचावून तन्मय होऊन मंदिराभोवती धावताना दिसतात, तर त्यांच्यासोबतचा लवाजमा मंदिराच्या छतावर काठीने प्रहार करतो आणि मंदिराच्या आतील प्रांगणात वस्तू फेकतो.

सणानंतर, मंदिर आठवडाभर बंद केले जाते. विधींनंतर स्वच्छतेसाठी मंदिर पुन्हा उघडले जाते, जेणेकरून कवु तीनडलचे डाग स्वच्छ करता येतील.

जाण्याचा मार्ग:
  • जवळचे रेल्वे स्थानक: अंदाजे 20 किमी दूर असलेले इरिन्जलकुड
  • जवळचे विमानतळ: अंदाजे 30 किमी दूर असलेले कोचिन आंततराष्ट्रीय विमानतळ.

Unknown column 'issueid' in 'where clause'