Trade Media
     

पुलिकली


Event date:
स्थळ: स्वराज ग्राउंड, त्रिशूर.

वाघ जेव्हा छान आनंदी मूडमधे असतात तेव्हा नाचतात! जंगलात कधीही न पाहिलेले आणि न ऎकलेले. पण हे नृत्य त्रिशूर शहरामधील स्वराज ग्राउंडच्या मार्गावर दिवसाच्या उजेडात पाहता येते. ओणमच्या आगमनाबरोबर, हा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी संपूर्ण केरळ पारंपरिक उत्सवांच्या आयोजनात व्यस्त असते: ओणम केरळमधील सर्वात मोठा उत्सव आहे; आणि असा उत्सव जो प्रेक्षकांना आनंदित करतो आणि त्यांचे मनोरंजन करतो तो आहे हा पुलिकली वा वाघांचे नृत्य.

जरी ओणमच्या दरम्यान केरळाच्या विभिन्न भागात पुलिकली प्रदर्शित करण्यात येत असली तरी,त्रिशूरमधे हे नृत्य मोठया प्रमाणात कलाकार आणि दर्शकांच्या उपस्थितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रदर्शन करण्यासाठी, पुरुष मंडळी वाघासारखे दिसण्यासाठी मोठ्या काळजीपूर्वक आपले शरीर आणि चेहर्‍यावर चित्रकारी करतात. ते समूह करुन चालतात आणि वाद्ययंत्राच्या धुनेवर नाच करतात आणि बंदूकधारी शिकारी बरोबर लपाछपीचे दृश्य सादर करण्यासाठी अभिनय करतात. वाघाचा प्रतिकात्मक विशिष्ट काळा आणि पिवळा रंग याव्यतिरीक्त कलाकार त्यांच्या वाघ मेक अपच्या रंगात आपल्या हिशोबाने फ़ेरबदल करतात आणि शेवटी जनतेचे मनोरंजन करण्यासाठी रंगाच्या हैदोसात मिसळून जातात.

येथे जाण्यासाठी:
  • जवळचे रेल्वेस्थानक: त्रिशूर,साधारण 1 किमीच्या आत
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्रिशूरपासून साधारण 40 किमी दूर. 

Unknown column 'issueid' in 'where clause'