Trade Media
     

उत्रालिक्कावु पूरम


Event date:
स्थळ: श्री रुथिर महाकालीकवु मन्दिर, परुथिप्र, वडक्कनचेरी, जिल्हा त्रिशूर.

देवी कालीला समर्पित, श्री रुथिर  महाकालीकवु मन्दिरात आयोजित हा उत्सव क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध उत्सव आहे ज्याला उत्रालिक्कावु पूरम असे म्हणतात. 8-दिवस चालणारा ह्या समारोहाचे मुख्य आकर्षण आहे दिवस-रात्र निघणारी हत्तींची मिरवणूक. उत्सवाचा अंतिम दिवस पूरम दिवस म्हणून साजरा केला जातो जिथे रंगीत छत्र्यांनी पारंपरिक ढंगात सुसज्जित 21 हत्तींची रांग, झूलते वेंचमरम (सफेद गुच्छ ज्याचा प्रयोग उत्साह वाढवण्यासाठी केला जातो) आणि आलवट्टम (मोर-पिसाचे पंखे) असतात. पारंपरिक सांगीतिक समूह जसे की पंचवाद्यम, आणि पंडिमेलन ह्या चमत्कारी प्रदर्शनाला लय प्रदान करतात. उत्सवाच्या दिवसात सांस्कृतिक मेळ्यामधे मन्दिराची कला आणि लोक कला प्रदर्शित होते.

येथे जाण्यासाठी:
  • जवळचे रेल्वे स्थानक: त्रिशूर, साधारण 20किमी दूर
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्रिशूरपासून साधारण 58 किमी दूर.

Unknown column 'issueid' in 'where clause'