Trade Media
     

कुट्टू करी

 
 
हा व्हिडिओ कुट्टू करी कशी बनवतात ते सांगतो.

सामग्री
  • उकडलेले बटाटे - 2 (चौकोनी तुकडे करून)
  • लहान कांदे (कापलेले) - 10
  • आले – एक इंचाचा तुकडा
  • लसून
  • भिजवलेली उडीद डाळ  (वडे बनविण्यासाठी) - 1/2 कप
  • हिरव्या मिरच्या - 3
  • लाल तिखट - 1 चमचा
  • धणे पावडर - 2 चमचा
  • हळद - ½ चमचा
  • मिरी पावडर - ½ चमचा
  • गरम मसाला पावडर - ½ चमचा
  • मोहरी - 1 चमचा
  • नारळाचे दूध - 1/2 कप
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • तेल
  • मीठ - चवीपुरते

कृती
लहान कढई घ्या आणि थोडे तेल तापवा. उडीद डाळीच्या वाटणात वडे बनविण्यासाठी मीठ घाला (वाटण पाणी न घालता वाटलेले). आता एक चमचा मिश्रण घेऊन आणि तापलेल्या तेलात घाला. चांगले तळा. वडे बाउलमध्ये काढून बाजूला ठेवा.  
 
आता कढईत तीन चमचे तेल तापवा. मोहरी आणि कढीपत्ता घाला. तडतडल्यावर, आले, लसूण, कांदे आणि हिरव्या मिरच्या घाला. थोडे परता. आता बटाटे चौकोनी कापा व यात घाला. थोडा वेळ परता. आता तुम्ही धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि मिरी पावडर घाला. एकत्र परता.

आता तुम्ही एक कप पाणी घाला. मीठ घालून ढवळा. भांडे झाका आणि चांगले शिजवा. पाणी पूर्ण उडून गेले की जाडे नारळाचे दूध घाला. थोडे ढवळा. आता वडे घाला. थोडा वेळ उकळू द्या. चांगले मिसळा आणि कोथिंबीर घाला.

कुट्टू करी गरम गरम वाढा. भाताच्या प्रकारांबरोबर चांगली लागते.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia