Trade Media
     

पझम पुलिसेरी

 
 
हा व्हिडिओ पझम (केळ्याची) पुलिसेरी कशी बनवतात ते दाखवतो.

सामग्री
  • पिकलेले केळे - 1
  • नारळ (खोवलेला) - 1 कप
  • हिरव्या मिरच्या - 3
  • हळद - ½ चमचा
  • जिरे - ¼ चमचा
  • मेथी पावडर - ¼ चमचा
  • ताक - 500 मिलि
  • साखर - 1 चमचा
  • मीठ
  • तेल
  • कढीपत्ता
  • कांदे (लहान) - 2
  • मोहरी - 1 चमचा (फोडणीसाठी)

कृती
पिकलेल्या केळ्याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा. ते भांड्यात घाला. पाणी घालून चांगले शिजवा.

आता, एक कढई घ्या, आणि थोडे तेल तापवा. थोडी मोहरी घाला. ती तडतडल्यावर कढीपत्ता आणि लहान कांदे घाला. थोडे परता आणि मेथी पावडर घाला. पुन्हा परता. खोवलेला नारळ ,हिरव्या मिरच्या, हळद आणि जिरेपुडीचे वाटण करून घाला. चांगले ढवळा.

तुम्ही हे आता शिजवलेल्या केळ्यावर घालू शकता. थोडे पाणी घाला. चांगले ढवळा. साखर आणि मीठ घाला. चांगले मिसळा. उकळी आल्यावर, ताक घाला आणि चांगले ढवळा.

पझप पुलिसेरी चा आस्वाद घ्या.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia