हा व्हिडिओ केळ्याच्या पानाच्या वेष्टनातला मासळी मसाला (वजाइला)बनविण्याची कृती दाखवितो.
एक किलोग्रॅम सीर मासा, पर्ल स्प्रॉट किंवा पॉम्फ्रेटचे स्वच्छ केलेले तुकडे तयार ठेवा.
तीन किंवा चार चमचे खोबरेल तेलात खालील गोष्टी परता:
- बारीक चिरलेले कांदे - 4 ते 5.
- बारीक तुकडे केलेलं आलं - 2 ते 3 इंच
- बारीक चिरलेली लसूण - 10 ते 12 पाकळ्या
परतलेलं मिश्रण हलक्या तपकिरी रंगाचं झाल्यावर, आचेवरून खाली उतरवा आणि दुसर्या भांड्यात काढून बाजूला ठेवा.
आता, याच भांड्यात, दोन चमचे तेल ओता आणि खालील गोष्टींपासून बनविलेली पेस्ट भाजा:
- लाल तिखट - 4 चमचे
- हळद - ½ चमचा
- मेथी पूड - ½ चमचा
ही पेस्ट तिन्ही पावडरी थोड्या पाण्यात मिसळून किंवा एकत्र दळून तयार केली जाते.
भाजल्याचा वास येईपर्यंत परता. नंतर पाव किलो चिरलेले टॉमेटो त्यात घाला. टॉमेटो मऊ होईपर्यंत शिजवा. आता त्यात परतलेले कांदा-आलं-लसणीचे मिश्रण घाला. एक चमचा व्हिनेगर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले ढवळा.
सगळे पदार्थ चांगले एकत्र झाल्यावर, भांडे आचेवरून खाली उतरवा आणि बाजूला ठेवा.
केळ्याचे एक पान घ्या आणि ते मऊ करण्यासाठी आगीवर धरा. त्याला थोडेसे तेल लावल्यावर थोडा मसाला घाला आणि माश्याचा तुकडा त्यावर ठेवा. माश्यावर थोडा आणखी मसाला लावा आणि मासा पानात गुंडाळून घट्ट बांधा.
जाड परताचे भांडे गरम करा आणि त्यात थोडे तेल घालून माश्याचे पाकिट त्यात शिजवा. मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा, मध्ये मध्ये मासा परतत रहा.
केळीचे पान हलक्या तपकिरी रंगाचे झाल्यावर मासा जवळजवळ शिजला असे समजा.
पाककृती: श्रीमती.लेलु रॉय (संदर्भ: लोनली प्लॅनेट एन्ड रफ गाईड)
ईमेल: simonroy@hotmail.com
दूरध्वनी: +91 471 2215377