Trade Media
     

पुट्टू आणि कडला करी

 
 
पुट्टू बनविण्यासाठी आवश्यक सामग्री
  • पुट्टू मावू (तांदुळाचे पीठ) – दोन कप
  • मीठ
  • गरम पाणी
  • खोवलेला नारळ

पुट्टू बनविण्याची कृती
प्रथम तांदुळाच्या पिठात पुरेसे गरम पाणी ओता. हाताच्या बोटांनी पीठ नीट मळून एकत्र करून घ्या. पुट्टू बनविण्यासाठी तुम्ही परंपरागत आलेल्या पुट्टू कुडम पात्राचा वापर करू शकता. त्या गोलाकार पात्रामध्ये एक चमचा खोवलेला नारळ घालून तुम्ही सुरु करू शकता. त्यानंतर त्यात नीट एकत्र केलेले तांदुळाचे पीठ घाला. तुम्ही पात्रात तांदुळाच्या पीठ घालताना मधूनच देखील थोड्या प्रमाणात खोवलेला नारळ घालू शकता. तो गोलाकार पूर्णपणे भरला आहे याची खात्री करून घ्या आणि आता हे गोल तुम्ही वरून झाकण लावून पुट्टु कुडममध्ये ठेवू शकता. ते शिजण्यासाठी वाफ़ नीट जातेय ना याची खात्री करा.

तुमचे पुट्टू आता तीन मिनिटांमध्ये तयार होईल. कडला करीबरोबर याचा उत्तम आस्वाद घ्या.

कडला करीसाठीची सामग्री
  • हरभरे (बंगाल ग्राम) – 1 कप
  • छोटे कांदे (चिरलेले) –1 कप
  • नारळ (खोवलेला) –1 कप
  • धनेपूड – 2 चमचा
  • लाल तिखट –1 चमचा
  • हळद –1/2 चमचा
  • गरम मसाला – ½ चमचा
  • नारळ – (चौकोनी तुकड्यांच्या आकारात) –1/4 कप
  • टोमॅटो (कापलेला) –1/4 कप
  • कढीपत्याची पाने
  • कोथिंबीर
  • मीठ
  • तेल
  • मोहरी
  • लाल मिरच्या
  • आले-लसूण पेस्ट

कडला करी – बनविण्याची कृती
प्रथम हरभरे (बंगालग्राम) मीठ घालून कमीतकमी दहा तास पाण्यात भिजवून घ्या. त्यानंतर हे हरभरे उत्तम प्रकारे शिजवून घ्या आणि एका बाजूला ठेवा.

एका भांड्यात एक चमचा तेल गरम करून घ्या. त्यानंतर त्यात खोवलेला नारळ घाला आणि तो तांबूस होईपर्यंत परता. ह्यात धनेपूड, लाल तिखट आणि गरम मसाला घाला. आता परत हे सर्व मिश्रण तांबूस होईपर्य़ंत ढवळा. यानंतर ह्याची पेस्ट करून घ्या आणि एका बाजूला ठेवा.

एक भांडे घ्या आणि त्यात थोडे खोबरेल तेल गरम करा. त्यात थोडी मोहरी आणि लाल मिरच्या घाला. जेव्हा हे तडतडू लागेल तेव्हा चौकोनी तुकडे केलेले नारळाचे तुकडे घाला. थोडावेळ ढवळा आणि आता प्रथम त्यात आले-लसूण पेस्ट मग कांदे आणि टोमॅटो घाला. आता थोडी कढीपत्त्याची पाने घाला आणि अलगदपणे ढवळा. आता तुम्ही यात हरभरे घालू शकता. आता यात पुरेसे पाणी ओता आणि मीठ घाला. हे मिश्रण व्यवस्थित ढवळा.

आता ह्या शिजवलेल्या हरभर्‍यांमध्ये याआधी एका बाजूला करून ठेवलेली नारळाची पेस्ट घाला. आता ही करी चांगली उकळून घ्या.

तुम्ही आता या करीला चिरलेल्या कोथिंबिरीने सजवू शकता आणि पुट्टूबरोबर वाढलेली सर्वात उत्तम. ही अगदी झकास जोडी आहे.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia