सांबार हा अवियल प्रमाणेच चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ आहे; अवियलप्रमाणेच यात खूप प्रमाणात भाज्या वापरल्या जातात. मुख्य फरक असा आहे की, सांबार ही डाळीची आमटी असून ती भातावर घ्यायची असते तर अवियल ही नारळ घातलेली भाजी आहे.
सामग्री
- 1/2 कप तूर डाळ
- 1/2 कप मसूर डाळ
- 1 मोठे पडवळ
- 8 गवार
- 6 भेंडी
- 6 लहान अळूची पाने
- एक मध्यम आकाराचे वांगे
- 150 ग्रॅम काकडी
- 2 शेकटाच्या शेंगा
- 1 मध्यम आकाराचा बटाटा
- 1 मोठा कांदा
- 1 टॉमेटो
- 10 लहान कांदे
- 3 चमचे सांबार पावडर
- 3 सुक्या लाल मिरच्या
- ¼ कप कोळलेली चिंच
- 3 चमचे तेल
- 1 चमचा मोहरी
- 1 चमचा हिंग
- मीठ
- कढीपत्ता
- कोथिंबीर
कृती
सर्व भाज्या प्रेशर कुकरमध्ये घाला. डाळी, चिंच, मीठ आणि भाज्या बुडतील एवढे पाणी घाला. मोठ्या आचेवर शिजवा आणि शिटी होऊ द्या. शिटी झाल्यावर आच बंद करा आणि प्रेशर कुकरची वाफ जाईपर्यंत उघडू नका.
वाफ जिरल्यावर, कुकर उघडा आणि 2-3 चमचे सांबार पावडर, कोळलेल्या चिंचेचे पाणी आणि हिंग घाला.
ढवळा. मिश्रण दोन मिनिटे तापवा. तेलात मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता तडतडू द्या. ही फोडणी कुकरमधील सांबारवर घाला आणि कोथिंबिरीने सजवा.
श्रीमती. लीला वेणू कुमार
दूरध्वनी: +919895534383
ईमेल: devoo_07@yahoo.co.in